शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबाद नगरपालिका; ४६ ठरावांना१२ नगरसेवकांची नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:38 IST

येथील नगरपालिकेत ३ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण ४६ विषयाला १२ नगरसेवक नापसंती दर्शवून सभागृहाबाहेर पडले़ त्यावेळी नगराध्यक्षांनी सभा तहकूब केली.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेतील प्रकार

धर्माबाद : येथील नगरपालिकेत ३ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण ४६ विषयाला १२ नगरसेवक नापसंती दर्शवून सभागृहाबाहेर पडले़ त्यावेळी नगराध्यक्षांनी सभा तहकूब केली.येथील नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, काँग्रेसचे दोन, भाजपचे चार, बसपा एक, राजप एक व एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आलेला असून काँग्रेस पक्षांचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कारभार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा चालत असताना या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्हीही पक्षांतील नगरसेवकांत उघडउघड फूट पडलेली दिसून आले.३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बारा नगरसेवकांच्या प्रभागातील विषय विषयपत्रिकेत नसल्यामुळे व काही आर्थिक तडजोडीचे विषय नगराध्यक्षांनी ठेवलेले निदर्शनास आल्यामुळे १२ नगरसेवकांनी सर्व ४६ विषयांना नापसंती दर्शविली. तसेच सभागृहातून सभापती निलेश पाटील बाळापूरकर, नगरसेवक सुधाकर जाधव, श्यामराव गोणारकर, युनूस खान, भाजपाचे संजय पवार, साय्यारेड्डी गंगाधररोड, कविता बोल्लमवार, रूपाली पाटील बाळापूरकर, साधना सुरकूटवार, श्रीमती अफसरी बेगम, श्रीमती अहेमदीबेग, महादाबाई वाघमारे हे सभागृहा बाहेर पडले. शेवटी हा प्रकार पाहून नगराध्यक्षांनी सभा रद्द केली.विविध पक्षांचे १२ नगरसेवक एकत्र येऊन पालिकेत एक गट तयार केलो. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेस दोन, भाजपा चार व अपक्ष दोन हे सर्व नगरसेवक आपल्या प्रभागाच्या विकासासाठी पक्षभेद दूर ठेऊन एकत्र आल्याचे सांगण्यात येत आहे़ गेल्या दोन वर्षांपासून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी मनमानी कारभार करीत असून काही मोजक्याच नगरसेवकांना विश्वासात घेऊन पालिकेचा कारभार करीत असल्याचा आरोप १२ नगरसेवकांनी केला आहे.

  • या सभेत एकूण ४६ विषय ठेवण्यात आले़ त्यामध्ये सन १९६८ सालची जुनी पाईपलाईन असून बहुतांश ठिकाणी फुटलेली असल्याने पाणी वाया जाते़ त्यावर मात करण्यासाठी दुरूस्तीचा ठराव हायकोर्टाने दिलेला आदेश नानाभाऊ नगरपालिकेतील वारसांना नोकरीवर घेणे हा एक ठराव, पाणीटंचाई लक्षात घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रामनगर, इंदिरानगर व अन्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे, पाण्याच्या टाकीजवळ पाणी वाया जाऊ नये म्हणून मशीन उभारणे, असे विविध विकासात्मक मुद्दे विषय ठेवण्यात आले होते. पण १२ नगरसेवकांनी सर्वच विषयाला नापसंती दर्शवून विरोध केला. विषयावर अभ्यास न करताच विकासकामाला विरोध करणे हे जनतेची सेवा न करणे होय, असे उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांनी सांगितले.
  • धर्माबाद नगरपालिकेत नगराध्यक्षा अफजल बेगम अब्दुल सत्तार काँग्रेस पक्षाचा असून त्यांच्याच विरोधात सर्वसाधारण सभेत विषयाला दोन काँग्रेस नगरसेवकांनी विरोध केल्याने उघडउघड काँग्रेस पक्षांत फूट निर्माण झाली आहे. उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी राष्ट्रवादीचे असून राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतसुद्धा फूट निर्माण झाली आहे.
टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस