देवायचीवाडी ,काटकळबा,मजरे धर्मापुरी पंचवीस वर्षात पंधरा वेळा महिलांनी भूषवले सरपंचपद....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST2021-01-08T04:54:34+5:302021-01-08T04:54:34+5:30
बारुळ- कंधार तालुक्यातील देवयाचीवाडी,काटकळबा,मजरे, धर्मापुरी, राहटी ग्रामपंचायतीच्या मागील पंचवीस वर्षाच्या इतिहासात १५ महिलांना वीस वर्षे सरपंच पदी काम करण्याची ...

देवायचीवाडी ,काटकळबा,मजरे धर्मापुरी पंचवीस वर्षात पंधरा वेळा महिलांनी भूषवले सरपंचपद....
बारुळ-
कंधार तालुक्यातील देवयाचीवाडी,काटकळबा,मजरे, धर्मापुरी, राहटी ग्रामपंचायतीच्या मागील पंचवीस वर्षाच्या इतिहासात १५ महिलांना वीस वर्षे सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली तर बारूळ येथे पंचवीस वर्षात एकाच वेळेस महिलांना सरपंच पदाची संधी मिळाली. अनेक महिलांच्या कार्यकाळात त्यांच्या घरातील पुरुषांनी किंवा सत्ताधारी गटातील प्रमुखाने पडद्यामागून सूत्रे हलविली यामुळे गावातील महिलाविषयक प्रश्न कायम राहिले ते प्रश्न ना पुरुष सरपंचांना सोडविता आले ना महिला सरपंचाच्या काळात सुटले
आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत त्यात राजकीय क्षेत्रही मागे राहिले नाही. शासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य सरपंच पदाचे महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण काढण्यात येत आहे त्यामुळे आपसूकच महिलांना ग्रामपंचायतीचा म्हणजे गावाचा कारभार हाकून गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आपले योगदान देण्याचा मार्ग खुला झाला. देवायचीवाडी,काटकळबा,मजरे वरंवट राहटी चिचोली मगलसागवी मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीतील २० महिलांच्या हाती सरपंच पद राहिले तर बारुळ औराळ चिखली नदनवन बाचोटी ग्रामपंचायतीत मागील पंचवीस वर्षाच्या काळात फक्त एकच वेळेस तर काही ठिकाणी दोन वेळस महिला सरपंचांनी कारभार पाहिला. महिलांना सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली असती तरी त्यांना गावच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविता आलेल्या नाहीत, कधी पती कधी मुलगा तर कधी सत्तेतील पदाधिकारी कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने त्यांच्या कामकाजावर त्यांचा परिणाम झाला. विशेष काय या महिलांना काम करताना गावातील महिलांसाठी सोयीसुविधा नियुक्त सार्वजनिक शौचालय उभे करता आले नाही. इथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. गत वर्षी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आल्याने पाण्याची सोय झाली मात्र, योजनेआधी पाण्यासाठी महिलांची अहोरात्र होणारी धावपळ वेगळीच होती. शिवाय महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनाही गावात प्रभावीपणे राबविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यापूर्वी झाले. तेच दुर्लक्ष महिला सरपंच असतानाही केवळ पुरुषांच्या हस्तक्षेपामुळे झाले.
ग्रामीण भागात जुन्या संकल्पना कायम...
महिला सरपंच चांगले काम करू शकतात मात्र पुरुषांच्या हस्तक्षेपामुळे महिलांची पदे ही केवळ नावाला उरली आहेत. कामकाज करताना कधी घरातील पुरुषाचा तर कधी सत्तेतील सहकाऱ्यांचा हस्तक्षेप होतो. आजही ग्रामीण भागात महिलांची चूल आणि मूल ही संकल्पना कायम आहे. मुलगी शिकली आणि प्रगती झाली ही बाब खरी आहे मात्र राजकारणात ते सूत्र लागू होत नाही.