शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

बीडमध्ये शिवसंग्रामच्या समर्थनानंतरही राष्ट्रवादीचा ठराव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:19 AM

समाजकल्याण खात्यांतर्गत दलित वस्ती सुधार व इतर कामांवरील २७ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये खर्चास कार्यात्तर मंजुरी देण्याचा विषय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजला. राष्ट्रवादीचा कॉँग्रेसच्या सदस्यांनी विरोध करत मांडलेल्या ठरावाचे सत्तेत सहभागी शिवसंग्रामच्या चार सदस्यांनी समर्थन केले. मात्र हा ठराव १८ विरुद्ध २९ मतांनी बारगळला.

ठळक मुद्दे१८ विरुद्ध २९ मतांनी ठराव बारगळला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : समाजकल्याण खात्यांतर्गत दलित वस्ती सुधार व इतर कामांवरील २७ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये खर्चास कार्यात्तर मंजुरी देण्याचा विषय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजला.  राष्ट्रवादीचा कॉँग्रेसच्या सदस्यांनी विरोध करत मांडलेल्या ठरावाचे सत्तेत सहभागी शिवसंग्रामच्या चार सदस्यांनी समर्थन केले. मात्र हा ठराव १८ विरुद्ध २९ मतांनी बारगळला.

समाजकल्याण विभागांतर्गत मुख्यत्वे दलित वस्ती सुधार योजनेसाठीच्या निधीचे समान वाटप केले नाही. जि. प. सदस्यांच्या हक्काचा निधी थेट ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आला. निधी वाटपात अन्याय झाला. यात घोडेबाजार झाला असे आरोप होत होते. जिल्हा परिषदेच्या सभेत मंगळवारी हा विषय चर्चेला आला. या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्याचा विषय आल्यानंतर राष्टÑवादीच्या गटाकडून विरोध झाला. तसेच मतदानाचा आग्रह धरला. अध्यक्षा सविता गोल्हार यांनी असा ठराव होऊ नये, चुकीचा पायंडा पडेल या भूमिकेतून प्रयत्न केले. परंतू विरोधक ठाम होते.

समाजकल्याणचा निधी समप्रमाणात वाटप करणे गरजेचे होते. तसेच सर्कलस्तरावर केलेल्या कामांची यादी अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. अन्यायामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली असे शिवसंग्रामचे सदस्य भारत काळे, अशोक लोढा यांनी सांगितले. तर कार्योत्तर मंजुरीच्या ठरावप्रसंगी भाजप- शिवसेना बरोबर राहिले. काही तटस्थ राहिले. काही मतदानाआधी निघून गेले. हा त्यांचा पराभव असल्याचे समाज कल्याण सभापती संतोष हंगे यांनी सांगितले. अर्थसंकल्पासाठीच्या या बैठकीत हाच विषय राजकीय गोटात चर्चेचा ठरला.हात वर करून झाले मतदानत्यामुळे कार्योत्तर मंजुरीला विरोध करणारा १०३ क्रमांकाचा ठराव सूचक जयसिंह सोळंके यांनी मांडला. त्यास बजरंग सोनवणे यांनी अनुमोदन दिले. अखेर यावर मतदान घ्यावे लागले. हात वर करुन मतदान झाले. ठरावाच्या बाजुने १८ मते पडली. यात शिवसंग्रामच्या ४ सदस्यांचाही समावेश होता.उपस्थित सदस्यांपैकी एक आशा दौंड तटस्थ राहिल्या तर दुसºया सदस्या रेखा क्षीरसागर सभागृहातून निघून गेल्या. कार्योत्तर मंजुरी मिळावी या बाजुने २८ सदस्यांनी मतदान केले. शिवसंग्रामच्या भूमिकेमुळे झेडपीमधील राजकीय खदखद पुन्हा एकदा समोर आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसVinayak Meteविनायक मेटेzpजिल्हा परिषदBeedबीड