उपप्राचार्य कद्रेकर सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:17+5:302021-06-04T04:15:17+5:30
अहिल्याबाई होळकर जयंती देगलूर : देगलूर येथील महाविद्यालयात पुण्यश्लाेक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रकाश पाटील, ...

उपप्राचार्य कद्रेकर सेवानिवृत्त
अहिल्याबाई होळकर जयंती
देगलूर : देगलूर येथील महाविद्यालयात पुण्यश्लाेक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रकाश पाटील, शशिकांत चिद्रावार, विलास तोटावार, देवेंद्र मोतेवार, रवींद्र ध्याडे, अभियंता भरत अटकळीकर, प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, प्रा. डॉ. नरवाडे आदी उपस्थित होते.
मोदी सरकारची सप्तवर्षपूर्ती
नायगाव : मोदी सरकारने सात वर्षे पूर्ण केल्याबद्दल नायगाव भाजपच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे बालाजी बच्चेवार, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन गजानन चव्हाण यांनी केले. यानंतर हेडगेवार चौकात मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी देवीदास पाटील, दत्ता पाटील, भाऊराव पाटील, शिवाजी पाटील, गंगाधर पाटील, राजेश सोनकांबळे आदी उपस्थित होते.
पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध
माहूर : पत्रकार रवींद्र तहकीक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा माहूर तालुका मराठी पत्रकार संघ व तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरफराज दोसानी, जयकुमार अडकिणे, साजिद खान, राज ठाकूर, गजानन भारती, संजय सुरोशे, संजय सोनटक्के, ज्ञानेश्वर पवार, राज ठाकूर, राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
मरखेलचा वीजपुरवठा सुरू
देगलूर : मरखेल येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत महाविरतणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. रात्री-बेरात्री वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी मध्यरात्री १२च्या सुमारास गुल झालेली वीज तब्बल २० तासांनंतर सुरू झाली. महावितरणच्या नांदेड येथील वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अहिल्याबाई होळकर जयंती
देगलूर : ग्रामपंचायत कार्यालय हणेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विवेक पडकंठवार, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बंदखडके, उमाकांत पंचगल्ले, वसंत आडेकर, राजकुमार भाये, माधव नामेवाड, रामदास बैलवाड आदी उपस्थित होते.
अवैध दारूविक्री बंद करा
नायगाव : तालुक्यातील अवैध दारू, मटका, जुगार बंद करण्याची मागणी आ. राजेश पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. १ जून रोजी त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यामध्ये त्यांनी मतदारसंघातील अनेक गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याचे नमूद करून ती बंद करण्याची मागणी केली.
शासनाच्यावतीने मदत
हिमायतनगर : तालुक्यातील बोरगडी तांडा नं.१ मधील तरुण शेतकरी पंडित चव्हाण यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांना शासनाच्या वतीने ४ लाखांचा धनादेश आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी तहसीलदार एन.डी. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. चेना, लिपिक मकरंद भालेराव, पर्यवेक्षक एम.डी. सूर्यवंशी, कृषी सहायक बालाजी मांजरमकर, तलाठी जी.के. आनरवाड, विकास पाटील, सुभाष राठोड आदी उपस्थित होते.
हिमायतनगरात विजेचा लपंडाव
हिमायतनगर : शहरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा-रात्री केव्हाही वीज गुल होते. वीज वितरणने नागरिकांच्या भावनांशी खेळ चालविला असून हा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
खोदलेल्या रस्त्याची दैना
किनवट : वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते खोदून पाइप टाकल्यानंतर खड्डे योग्य पद्धतीने बुजवण्यात आले नाहीत. परिणामी रस्त्याची दैना झाली असून जागोजागी झालेल्या चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागते. किनवट नगरपालिकेच्या वतीने सुमारे २० कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. योजनेचे काम उरकण्याच्या हेतूने रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.
वृक्षारोपण मोहीम प्रारंभ
कामठा बु.: येथील वडार समाजाच्या वतीने वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली. उपसरपंच रणजीतसिंग कामठेकर यांच्या हस्ते महादेव मंदिर, खंडोबा मंदिराच्या पटांगणात वडाची झाडे लावून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रा.पं. सदस्य इरबा गुंजकर, शिवशंकर बरगळ, सोमनाथ दासे, बबन गव्हाणे, शिवाजी वाघमारे, धनाजी गाडवे, संजय साखरे आदी उपस्थित होते.
मुखेडकर यांना पदोन्नती
लोहा : येथील पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. १९८९ मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले होते. या दरम्यान भोकर, इतवारा, लोहा आदी ठिकाणी त्यांनी काम केले. पदोन्नतीबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.
शिंदे यांना श्रद्धांजली
हदगाव : डॉ. गणेश शिंदे यांना मराठा सेवा समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शिंदे यांच्या निधनामुळे समाजाचे नुकसान झाल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
डाकपाल पठाण यांचा सत्कार
शंकरनगर : येथील डाक कार्यालयातील डाकपाल आय.जी. पठाण सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी एस.पी.एम. येडपलवार, नायगावचे अली, डाक पतसंस्थेचे चेअरमन गंगाधर भिलवंडे, काळे, सादिक पठाण, दत्ता पाटील, नागोराव कांबळे, शंकर मोरे, जाकीर देसाई, सरफोद्दीन रावळकर, देवीदास गजभारे, स्वाती पांचाळ, कोकणे, सत्तार, इनामदार, राजू बामणीकर आदी उपस्थित होते.
मोहन भोसले रुजू
उमरी : येथील नूतन पोलीस निरीक्षक म्हणून मोहन भोसले यांनी सूत्रे स्वीकारली. यापूर्वी येथे दत्तात्रय निकम यांची पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. दरम्यान, भोसले यांचे अनेकांनी स्वागत केले.
सारखणीत गुटखा जप्त
किनवट : तालुक्यातील सारखणी येथे अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून ६७ हजारांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके तपास करीत आहेत.