शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:08 IST

दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर : पेसायुक्त तालुक्यातील मध्यान्ह भोजनाच्या आदेशाला शिक्षण विभागाचा ठेंगा

श्रीक्षेत्र माहूर : दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेत राज्य सरकारने उन्हाळी सुट्यातही या टंचाईग्रस्त गावांतील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत.२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यातही मध्यान्ह भोजन देणे अपेक्षित होते. मात्र माहूर तालुक्यातील काही बोटावर मोजण्याएवढ्या शाळा वगळता इतर अनेक गावांत मध्यान भोजन योजनेबाबतच्या शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचे बोलल्या जात आहे. माहूर पं.स.च्या शिक्षण विभागामार्फत मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आवश्यक असताना अनेक शिक्षक उन्हाळी सुटीनिमित्त गावाकडे गेले आहेत़ अशावेळी अनेक ठिकाणी खिचडी कामगारावरच सर्व जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे दिसत आहे.जि. प. शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी यांना खडे बोल सुनावल्यानंतर मध्यान्ह भोजन नियोजन या शीर्षकाखाली अनेक शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या़प्रत्यक्ष मात्र एकही शिक्षक शाळेवरच नव्हे, तर मुख्यालयीसुद्धा दिसून आले नसल्याने शिक्षण विभागाचे नियोजन म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे संतप्त नागरिकांतून बोलल्या जात आहे. माहूर पं. स. चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांनी मध्यान्ह भोजनाची पाहणीसुद्धा केली नसल्याची माहिती आहे. शिक्षण विभागाने गोपनीय पथक पाठवून प्रत्यक्ष शाळाना भेटी दिल्यास गौडबंगाल समोर येणार आहे.टंचाईग्रस्त यादीत ९२ गावांचा समावेशपेसायुक्त तालुक्यातील अनेक गावांचे शालेय विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित असून अनेक गावांत खिचडी कामगारच कामे करत आहेत़ शिक्षकांच्या ड्युट्या असतानाही प्रत्यक्ष एकही शिक्षक हजर नाही़ मध्यान्ह भोजन ड्युटी पत्रक केवळ नामधारी ठरले आहे़२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEducationशिक्षणStudentविद्यार्थी