उपेक्षितांच्या न्यायासाठी लढणार वंचित आघाडी -पक्षनिरीक्षक वसीम देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:35+5:302020-12-28T04:10:35+5:30

वंचित बहुजन आघाडीने आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी सुरू केली असून, त्या अनुषंगाने शुक्रवारी शहरातील संगम हॉल येथे ...

Deprived Front to fight for the justice of the neglected - Party Inspector Wasim Deshmukh | उपेक्षितांच्या न्यायासाठी लढणार वंचित आघाडी -पक्षनिरीक्षक वसीम देशमुख

उपेक्षितांच्या न्यायासाठी लढणार वंचित आघाडी -पक्षनिरीक्षक वसीम देशमुख

वंचित बहुजन आघाडीने आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी सुरू केली असून, त्या अनुषंगाने शुक्रवारी शहरातील संगम हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालिका निरीक्षक वसीम देशमुख यांनी ही माहिती दिली.

वंचित आघाडीने तयार केलेले कार्यकर्ते पळविले जात आहेत, त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. आगामी पालिका निवडणुकीत आमचा बलाढ्य शक्तींविरुद्ध लढा राहणार आहे. तो लढा मतदारांच्या ताकदीवर यशस्वी होईल. सध्यातरी वंचित आघाडीचा कुणासोबतही युतीचा विचार नाही. मात्र, ऐनवेळी वरिष्ठच याबाबत निर्णय घेतील. पुढील काळात तालुक्यात पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवण्यावर आमचा भर असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पक्ष निरीक्षक दीपक डोके, मुदखेडचे नगरसेवक कमलेश चौदंते, शेख गनी शेख महंमद, तालुकाध्यक्ष सुनील कांबळे, बाळासाहेब टिकेकर, बालाजी अनंतवाड, डौरकर यांची उपस्थिती होती.

Web Title: Deprived Front to fight for the justice of the neglected - Party Inspector Wasim Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.