रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:49+5:302021-05-18T04:18:49+5:30
विहिरीचे खोदकाम बंद करा कंधार : शासनाचे नियम डावलून चिखली ग्रामपंचायतअंतर्गत जेसीबीने विहिरीचे होत असलेले खोदकाम बंद करावे, ...

रिक्त पदे भरण्याची मागणी
विहिरीचे खोदकाम बंद करा
कंधार : शासनाचे नियम डावलून चिखली ग्रामपंचायतअंतर्गत जेसीबीने विहिरीचे होत असलेले खोदकाम बंद करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिखली ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरीचे काम सुरू आहे. सदर विहिरीचे काम मजुरांकडून करणे आवश्यक आहे. मात्र ते जेसीबीद्वारे करण्यात येत आहे. निवेदनावर मनोहर गायकवाड, शोभा कदम, सूर्यकांत करेवाड, रेखा गायकवाड यांच्या सह्या आहेत.
योगा वर्गाला प्रतिसाद
कंधार : कोरोना काळात योगासन व प्राणायामचे महत्त्व लोकांना कळत असून, शहरात पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी योग शिक्षक नीळकंठ मोरे यांनी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिकांना धडे दिले आहेत. या कार्याची दखल घेऊन नगरसेवक शहाजी नळगे यांनी लॅपटॉप भेट देऊन योग वर्गाला संजीवनी दिली आहे. यावेळी बालाजी पांडागळे, अनिल वट्टमवार, मुरलीधर थोटे, आदी उपस्थित होते.
रस्त्याचे काम रखडले
बिलोली - तालुक्यातील चिंचाळा ते कासराळी पाणंद रस्त्याचे काम गेल्या १६ महिन्यांपासून रखडले आहे. ग्रामपंचायतीचे ठराव घेऊनही पाठपुरावा करून सुद्धा हे काम होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चिंचाळा ते कासराळी पाणंद रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेंतर्गत करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी
अर्धापूर : अर्धापूर तालुक्यातील लोणी खु. येथे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ग्रामपंचायतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. तहसीलदार सुजित नरहरी, गटविकास अधिकारी मीना राहतोळे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या सूचनेवरून विस्तार अधिकारी डॉ. सुरेश गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना राबविण्यात आल्या.
अर्जापूर येथे सदस्यांचा सत्कार
बिलोली : तालुक्यातील अर्जापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते नागनाथ यन्नावार, सतीश जोशी यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सिद्धार्थ पतंगे, उपसरपंच प्रतिनिधी बाबा पटेल, सदस्य साईनाथ शेटेवाड, इम्तियाज शेख, जमालोद्दीनशेख, पोलीस पाटील संजय पतंगे, बालाजी मेडेकर, आदी उपस्थित होते.
शिवाजी जाधव यांची निवड
नायगाव : भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत शिवाजी जाधव सातेगावकर यांची नांदेड ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चंद्रकांत पवार, परमेश्वर जाधव, बालाजी पांचारे, बाबाराव कदम, साईनाथ कानोले, बालाजी पाटील होटाळकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट
नायगाव : सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत खड्डे बुजविण्याचे काम निकृष्टपणे होत असल्याची तक्रार नायगाव तालुक्यातील देगावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी केली. उपविभागात १२ कोटींच्या खड्डे बुजविण्याच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आजपर्यंत एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर डॉ. दत्ता मोरे, विठ्ठलराव मोरे, बळवंतराव मोरे, गणपत मोरे, सुभाष मोरे यांच्या सह्या आहेत.
मधुकर रावते सेवानिवृत्त
हिमायतनगर : तालुक्यातील सरसम येथील श्रीधरराव देशमुख विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले मधुकर बापूराव रावते यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नुकताच पार पडला. मधुकर रावते हे २४ वर्षे सेवेच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांना विद्यालयाच्या वतीने सपत्नीक निरोप देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, जे. बी. जाधव, रमेश चव्हाण, जी. एस. भावडे, परमेश्वर राऊतराव, पी .व्ही. कळसे, आदी उपस्थित होते.
सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन
उमरी : येथील निमटेक शिवारात बळीराज्य जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन रुद्रगीर महाराज किवळेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डॉ. यशपाल भिंगे, सरपंच विमलबाई गव्हाळकर यांची उपस्थिती हाेती. प्रदूषण मुक्ती, सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती अशी उद्दिष्टे समोर ठेवून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.