पेरणीपूर्वी पीक कर्ज देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:08+5:302021-06-05T04:14:08+5:30
न्या.सय्यद यांची बदली कंधार - येथील दिवाणी न्यायाधीश एल.एम. सय्यद यांची बदली झाल्याने अभिवक्ता संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात ...

पेरणीपूर्वी पीक कर्ज देण्याची मागणी
न्या.सय्यद यांची बदली
कंधार - येथील दिवाणी न्यायाधीश एल.एम. सय्यद यांची बदली झाल्याने अभिवक्ता संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर अध्यक्षस्थानी होते. अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.दिगंबर गायकवाड, पो.नि. व्ही.के.झुंजारे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ॲड.दिलीप कुरुडे यांनी तर ॲड.अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अभिवक्ता संघाचे सचिव ॲड.अनिल डांगे यांनी आभार मानले.
सुगाव ते वाघी रस्त्याचे भूमिपूजन
नांदेड - नांदेड उत्तर मतदारसंघातील सुगाव ते वाघी रस्त्याचे भूमिपूजन आ.बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते झाले. या कामाच्या मंजुरीसाठी कल्याणकर यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी संतोष भारसावडे, माधव हिंगमिरे, धनंजय पावडे, पांडुरंग शिंदे, दिलीप शिंदे, अनिल शिंदे, अमृत भारसावडे, गोविंदराव भारसावडे आदी उपस्थित होते.
जांब परिसरात पाऊस
जांब बु. - जांब परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना अडसर निर्माण झाला. वादळवारा व पावसामुळे घरावरील पत्रे उडाली. नांगरणी, वखरणी, कोळपणी, वेचणी, शेणखत घालणे आदी कामे रखडली आहेत.
अध्यक्षपदी अंबाळकर यांची निवड
हदगाव - ग्रामसंवाद सरपंच संघाच्या अध्यक्षपदी अंबाळाचे सरपंच नीलेश पाटील अंबाळकर यांची निवड झाली. लवकरच तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
मलदोडे यांना पीएच.डी.
लोहा - श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.साहेबराव मलदोडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांनी प्रा.डॉ.विलास आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. याबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
इस्लापूर येथे अभिवादन
इस्लापूर - माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथराव मुंडे यांना इस्लापूर येथे गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी बालाजी आलेवाड, मुख्याध्यापक सुग्रीव केंद्रे, बालाजी दुरपडे, मनोज राठोड, शिवाजी घोगरे, तुकाराम बोनगीर, सूर्यकांत बाेधनकर, शा.व्य.स.चे अध्यक्ष शिवशंकर मुंडे आदी उपस्थित होते.
भोकर तालुक्यात पाऊस
भोकर - तालुक्यात पूर्व मोसमी पाऊस सुरू झाला असून जून महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्र बरसले. मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चाहूल लागली आहे.
गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
अर्धापूर - भाजपच्या वतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ३ जून राेजी त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, विराज देशमुख, विलास साबळे, योगेश हळदे, बाबुराव लंगडे, शिवराज जाधव, तुकाराम साखरे, तुकाराम माटे, वैभव माटे, गोविंद माटे आदी उपस्थित होते.