बोधडी वनपरिक्षेत्रातंर्गत जंगलतोड वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:36 IST2018-07-16T00:36:12+5:302018-07-16T00:36:30+5:30
बोधडी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे वनपाल, वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्याने जंगलतोड वाढली आहे़ यामुळे वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे़

बोधडी वनपरिक्षेत्रातंर्गत जंगलतोड वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
बोधडी : बोधडी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे वनपाल, वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्याने जंगलतोड वाढली आहे़ यामुळे वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे़
बोधडीचा भाग हा घनदाट जंगलाने व्यापला आहे़ सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलात सागी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे़ या भागातील वनाचे रक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेले वनपाल व वनरक्षक हे मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येते़ लाकूड चोरट्यांनी हे अवैध वृक्षतोड चालविली आहे़ थारा परिमंडळात जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ थारा येथील वनपाल यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ हे वनपाल जंगलामध्ये फिरकत नसल्याने लाकूड चोरट्यांना चांगलेच अभय मिळत आहे़
या कर्मचाºयांवर वरिष्ठांचे नियंत्रण राहिले नसल्याने ते सोयीच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावत आहेत़ आदिवासी प्रोत्साहन भत्ता एकस्तर वेतनश्रेणी लाटणारे कर्मचारी मुख्यालयी का राहत नसतील असा प्रश्न उपस्थित होत आहे़