देगलूर-बिलोली इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST2021-05-29T04:15:10+5:302021-05-29T04:15:10+5:30

चौकट---------------- काँग्रेस - भाजपच्या रणनितीकडे लक्ष काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे ...

Deglaur-Biloli is the rope of aspiring candidates | देगलूर-बिलोली इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच

देगलूर-बिलोली इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच

चौकट----------------

काँग्रेस - भाजपच्या रणनितीकडे लक्ष

काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे काँग्रेसला याचा निश्चित फायदा मिळणार आहे. मात्र, काँग्रेस कोणाला निवडणूक मैदानात उतरविते? याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. जितेश अंतापूरकर यांचे नाव यामध्ये सर्वात पुढे आहे. मात्र, त्यांच्यावर नुकतीच युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविलेली असल्याने ऐनवेळी दुसरा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरविला जाण्याची शक्यता आहे. तूर्त तरी भीमराव क्षीरसागर यांच्यासह अन्य काही जणांनी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली आहे. क्षीरसागर हे पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

चौकट-------------------

मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढतीचे संकेत

महाविकास आघाडीत शिवसेना असल्याने माजी आ. सुभाष साबणे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. मात्र, साबणे हे निवडणूक रिंगणात राहण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडेही त्यांनी उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे. दुसरीकडे धोंडिबा कांबळे यांच्यासह प्रा. उत्तमकुमार कांबळे, डी. एम. कांबळे यांनीही तिकिटासाठी भाजपकडे मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे. वंचित बहुजन आघाडीही रिंगणात उतरणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी ते चौरंगी लढत अपेक्षित आहे. त्यातच माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Deglaur-Biloli is the rope of aspiring candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.