रुग्णवाहिकेचा लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:15 IST2020-12-08T04:15:40+5:302020-12-08T04:15:40+5:30

महामानवास अभिवादन देगलूर : तालुक्यातील मौजे सुंडगीर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रबुद्ध ...

Dedication of ambulance | रुग्णवाहिकेचा लोकार्पण

रुग्णवाहिकेचा लोकार्पण

महामानवास अभिवादन

देगलूर : तालुक्यातील मौजे सुंडगीर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रबुद्ध बुद्ध विहार समितीच्या वतीने भाेजनदान करण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रा. बालाजी कांबळे, गंगाधर सुंडगीकर, रणजित कांबळे, संजय कांबळे, प्रकाश कांबळे, विठ्ठल कांबळे, अक्षय कांबळे, भास्कर कांबळे, प्रशांत कांबळे, माधव कांबळे, संग्राम कांबळे आदी उपस्थित होते.

सदस्य नोंदणी सुरू

किनवट : महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनवट येथे शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख जोतिबा खराटे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, सचिन नाईक, सुदर्शन नाईक, सुरेश सातुरवार, संतोष येलचलवार, गजानन कोल्हे पाटील, व्यंकट भंडारवार, सुनील पाटील, गजानन कोल्हे आदी उपस्थित होते.

कोरोनाने एकाचा मृत्यू

लोहा : लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील ६५ वर्षीय इसमाचा कोरोनाने नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान ६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तालुक्यातील एक रुग्ण सध्या उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मयत इसम हा कोरोनाने बाधित होता.

Web Title: Dedication of ambulance