शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

होमगार्डच्या भरतीसाठी डी.एड., बी.एड. धारक उतरले मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:10 IST

बेरोजगार तरूणांचा मोठा लोंढा होमगार्ड भरतीत पाहायला मिळत आहे

ठळक मुद्दे एम.ए., बी.एड. शिक्षण पूर्ण झालेले हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयार करत आहेतअनेक दिवसांपासून शासनाकडून नोकरभरती करण्यात न आल्याने हे तरुण मैदानात

नांदेड : गुरूजी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डी.एड., बी.एड. करणारे अनेकजण होमगार्ड भरतीसाठी सोमवारी मैदानात उतरल्याचे चित्र नांदेडात पाहायला मिळाले़ अनेक दिवसांपासून शासनाकडून नोकरभरती करण्यात न आल्याने बेरोजगार तरूणांचा मोठा लोंढा होमगार्ड भरतीत पाहायला मिळाला़ 

जिल्ह्यातील विविध पथकासाठी नांदेड येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सुरू असलेल्या होमगार्ड भरतीसाठी सोमवारी जवळपास साडेतीन हजार उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे़ यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे पदवीधर  आणि पदव्युत्तर असल्याचे दिसून आले़ दहावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या होमगार्ड पदासाठी एम.ए., बी.एड. शिक्षण पूर्ण होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो तरूण रोजगार मिळविण्यासाठी होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात उतरले आहेत़ 

नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १८३ पुरुष व १७९ महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी १५ जुलै रोजी पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे नावनोंदणी करण्यात आली़ यामध्ये ३ हजार २९८ पुरूष उमेदवार तर ३३५ महिला उमेदवार असल्याची माहिती  जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली़ पहिल्या दिवशी उमेदवारांची छाती आणि उंचीची मोजणी करण्यात आली़

उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नाही़ त्यामुळे होमगार्ड भरतीत सहभागी झालोय़ बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सरकारने करावे़ - नितीन गादेकर, एमए, एमजे़

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीPoliceपोलिस