रुग्णसंख्या घट, गुरुवारी ८१६ बाधित निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:39+5:302021-04-30T04:22:39+5:30
चौकट------------------ १२९३ जणांची कोरोनावर मात गुरुवारी आणखी १२९३ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६६ ...

रुग्णसंख्या घट, गुरुवारी ८१६ बाधित निष्पन्न
चौकट------------------
१२९३ जणांची कोरोनावर मात
गुरुवारी आणखी १२९३ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६६ हजार ३०७ एवढी झाली आहे. गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये विष्णुपुरी वैद्यकीय महाविद्यालयातील २०, मनपा अंतर्गत एनआयआर भवन, गृहविलगीकरण आणि जम्बो कोविड सेंटरमधील ८३७, धर्माबाद ११, देगलूर ४, अर्धापूर १९, उमरी ५४, मालेगाव १, जिल्हा रुग्णालय २८, मुखेड २५, मुदखेड ३, किनवट ४६, हिमायतनगर ११, नायगाव ३, खासगी रुग्णालय ११८, आयुर्वेदिक महाविद्यालये १३, हदगाव १०, कंधार ११, माहूर १०, लोहा ६१ तर मांडवी कोविड सेंटरमधील ८ जणांनी कोरोनावर मात केली.
चौकट------------
शासकीय रुग्णालयात ६४ खाटा उपलब्ध
जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ११ हजार ४१६ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता शासकीय रुग्णालयातही खाटांची उपलब्धता वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी विष्णुपुरी रुग्णालयात २० खाटा शिल्लक होत्या तर आयुर्वेदिक महाविद्यालयात ३४ आणि जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये १० अशा ६४ खाटा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हाभरात उपचार सुरू असलेल्या ११ हजार ४१६ पैकी १८७ जणांची प्रकृती गंभीर आहे.