रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूमध्येही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:17+5:302021-04-16T04:17:17+5:30
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढतेय रुग्णसंख्येबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही गुरुवारी घट दिसून आली. त्याचवेळी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढत ...

रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूमध्येही घट
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढतेय
रुग्णसंख्येबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही गुरुवारी घट दिसून आली. त्याचवेळी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढत असल्याने नांदेडकरांना काहींसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी १०४७ जणांनी कोरोनावर मात केल्याने या कोरोनामुक्तांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यामध्ये विष्णूपुरीतील वैद्यकीय महाविद्यालयातील १५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील ५२८, कंधार ३, किनवट कोविड रुग्णालय १००, हिमायतनगर ९, माहूर २, देगलूर १५, मुखेड ७७, नायगाव १४, बारड १, अर्धापूर २४, बिलोली ३७, खाजगी रुग्णालयातील १०२, आयुर्वेदिक महाविद्यालय ८, हदगाव २०, धर्माबाद ९, उमरी १२, लोहा ३५ तर भोकर तालुक्यातील दोघेजण कोरोनामुक्त झाले आहेत.
चौकट----------------
१३ हजार ५१७ जणांवर उपचार
गुरुवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयात १३ हजार ५१७ जणांवर उपचार करण्यात येत होते. रुग्णालयातील रुग्णांची ही संख्या पाहता नागरिकांनी कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करीत घरीच थांबण्याची आवश्यकता आहे. उपचार सुरू असलेल्यांपैकी २२६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. दरम्यान, उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ७६.५६ इतके असल्याची माहितीही त्यांनी दिली.