दूध,भाजीपाल्यात घट
By Admin | Updated: November 20, 2014 14:57 IST2014-11-20T14:57:27+5:302014-11-20T14:57:27+5:30
तालुक्यातील ६00 लोकवस्तीचं गायतोंड हे गाव. मागासवर्गीय बहुतुल्य वस्ती. भूमिहीन मजूर व अल्पभूधारक सर्वत्र मिळतील.

दूध,भाजीपाल्यात घट
हदगाव : तालुक्यातील ६00 लोकवस्तीचं गायतोंड हे गाव. मागासवर्गीय बहुतुल्य वस्ती. भूमिहीन मजूर व अल्पभूधारक सर्वत्र मिळतील. पाण्याची व्यवस्था जेमतेम. शेताशेतामध्ये १५ बाय २0 आकाराने खोदलेल्या विहिरी आढळतात., परंतु जनावरांना व भाजीपाला खाण्यापुरताच पाणीसाठा येथे उपलब्ध आहे. येथील बहुतांश शेतकरी भाजीपाला काढून विक्री करतात. मनाठा, बामणीफाटा, वारंगा व हदगाव येथील आठवडी बाजारात येथील मंडळी जातात. अनेकांनी थोडीफार शेती व भाजीपाला विक्रीवर मुलींचे लग्न केले. मुलांचे शिक्षणही उरकले. अशांच्या चेहर्यावर आता मात्र असमाधानाची भावना पसरली आहे. आता काय करावे? वर्ष कसं काढणार? वर्ष धकलं तरी पुढं काय? पुढची पेरणी. आता पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडायचं कसं, याचीच चर्चा गावात सुरू असते.