कुत्र्याच्या हल्ल्यात मोराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:35 IST2018-07-16T00:34:47+5:302018-07-16T00:35:14+5:30

कंधार तालुक्यातील भूकमारी येथे रविवारी सकाळी लांडोर मादी जातीचा मोर गावात आला असता गावातील मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला़

 The death of the peal in a dog attack | कुत्र्याच्या हल्ल्यात मोराचा मृत्यू

कुत्र्याच्या हल्ल्यात मोराचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्माननगर : कंधार तालुक्यातील भूकमारी येथे रविवारी सकाळी लांडोर मादी जातीचा मोर गावात आला असता गावातील मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला़
गावातील नागरिकांनी कुत्र्याच्या तावडीतून मोराची सुटका करून ग्रामपंचायत येथे आणण्यात आले़ गावातील नागरिक व पोलीस पाटील यांच्या माध्यमातून वन विभागास याची माहिती देण्यात आली़ वन विभागातर्फे वनमजूर हणमंत जाधव यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला़ मोरावर पो़पा़ लक्ष्मणगवाले यांच्या हस्ते विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी वनमजूर हानमंत जाधव, पो़पा़ लक्ष्मण गवाले, पांडुरंग पवार, मगदूम सय्यद, संदीप पवार आदी उपस्थित होते़

Web Title:  The death of the peal in a dog attack