बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST2021-04-25T04:17:24+5:302021-04-25T04:17:24+5:30
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरुणाचा २७ एप्रिल रोजी विवाह होता. दोन्ही कुटुंबात लग्नाची ...

बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा मृत्यू
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरुणाचा २७ एप्रिल रोजी विवाह होता. दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. स्वताहा नवरदेव राजू वाळके हा किरकोळ खरेदीसाठी एम.एच.२६, बीके. ३३९२ या क्रमांकाची दुचाकी घेवून हिमायतनगर येथे गेला होता. या ठिकाणी खरेदी केल्यानंतर तो गावाकडे परत येत होता. वाळके याची दुचाकी विना क्रमांकाच्या एका दुचाकीवर जावून आदळली. या अपघातात राजू हा गंभीर जखमी झाला होता. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील श्रीगणेश कलाले आणि विनोद वांगे (रा. खडकी बाजार) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताने खडकी गावावर शोककळा पसरली आहे.