अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:19+5:302021-07-27T04:19:19+5:30
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत असलेल्या तथागतनगर, वाजेगाव येथील ८ वर्षीय बालक शेख इरफान शेख फय्याज हा २० जुलै ...

अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने बालकाचा मृत्यू
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत असलेल्या तथागतनगर, वाजेगाव येथील ८ वर्षीय बालक शेख इरफान शेख फय्याज हा २० जुलै रोजी संध्याकाळी सात वाजेदरम्यान, त्याच्या घरासमोरील कचरा जाळत होता. कचरा जाळत असतानाच शेख इरफान याच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने तो गंभीररीत्या भाजला गेला. त्याचवेळी, त्याला अधिक उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, २५ जुलै रोजी सकाळी शेख इरफानचा करुण अंत झाला असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रवीण केंद्रे व मदतनीस पो.कॉ. जनार्दन महाले यांनी दिली.
याप्रकरणी शेख इम्रान शेख फय्याज (रा. तथागतनगर, वाजेगाव) यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोकराव घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख अब्दुल जावेद हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.