दलितवस्ती, अंगणवाड्या, शाळा होणार पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST2020-12-22T04:17:41+5:302020-12-22T04:17:41+5:30
जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी ...

दलितवस्ती, अंगणवाड्या, शाळा होणार पाणीदार
जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. अशा गावांमधील नागरिकांना वैयक्तिक नळ जोडणी देण्याची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिले.
चौकट..........
१ लाख १५ हजार ५६५ नळ जोडणी केलेल्या कुटुंबांची नोंद
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडाेई ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४ हजार ५१२ कुटुंबापैकी १ एप्रिल २०२० पर्यंत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या संकेतस्थळावर १ लाख १५ हजार ५६५ नळ जोडणी केलेल्या कुटुंबांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गावस्तरावर सर्वेक्षण करुन २०२४ पर्यंतचा आराखडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तयार करणार आहेत. जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी तशा सूचना दिल्या आहेत.