शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पालम-लोहा महामार्गावर क्रुझर-कारचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 18:03 IST

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पालम(परभणी): क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरील पेठशिवनी येथे अपघात घडला. पालमवरुन नांदेडकडे (एमएच-04 इटी-2734 )क्रमांकाची कार लोह्याकडे जात होती. या कारची लोह्याकडून पालमकडे येणाऱ्या (एमएच-22एमएच- 6333) क्रमांकाच्या क्रूजरसोबत अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पेठशिवणी परिसरात या दोन्ही गाड्यांची भरधाव वेगात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील चार पैकी तिघे जागीच ठार झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे, फौजदार विनोद साने यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

यावेळी पोलिसांनी इतर लोकांच्या मदतीने जखमींना वाहनाबाहेर काढले. त्यांना सध्या पालम येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी पाठवून दिले. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामुळे मयतांना वाहनाबाहेर काढणे ही मुश्किल झाले होते. मयताच्या शरीरात कारचे पार्ट घुसले होते. अपघातातील मयतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

टॅग्स :AccidentअपघातParbhani spपोलीस अधीक्षक, परभणीNandedनांदेड