बाजारात उमरीकरांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:11+5:302021-04-28T04:19:11+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कामठा खु. : कामठा खु. येथे सोमवारी कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना देण्यात आली. तत्पूर्वी गावकऱ्यांना माहिती ...

Crowds of Umarikars in the market | बाजारात उमरीकरांची गर्दी

बाजारात उमरीकरांची गर्दी

कोरोना प्रतिबंधक लसीकरण

कामठा खु. : कामठा खु. येथे सोमवारी कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना देण्यात आली. तत्पूर्वी गावकऱ्यांना माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या वेळी सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी टी.एल. डोईबळे, भंडारे आदी उपस्थित होते.

फायर ऑडिट करा

नांदेड : नांदेड येथील सर्व कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघाचे अध्यक्ष सुनील डोईजड यांनी मनपा आयुक्तांकडे केली. नाशिक व विरार घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. अशा घटना नांदेडात घडणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुरेश भाले यांची बदली

मुदखेड : येथील पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांची परभणी येथे बदली झाली. त्यांनी सूत्रेही स्वीकारली आहेत. कोरोनामुळे त्यांचा निरोप समारंभ झाला नाही.

किरकोळ कारणावरून मारहाण

लोहा : तालुक्यातील किवळा येथे किरकोळ कारणावरून मारहाणीची घटना घडली. सोनखेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. व्यंकटी माणिक देवकांबळे यांना आरोपींनी मारहाण करून धमकी दिली. देवकांबळे यांनी या घटनेची फिर्याद दिली.

किनवटला दारू विक्री

किनवट : किनवट तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्या मार्गाने घरपोच दारू पोहोचवली जात आहे. दारूचे दर चारपटीने वाढले असले तरीही पिणाऱ्यांची संख्या तेवढीच आहे. किनवट शहरातील अनेक भागांत हातभट्टी दारूची मागणी वाढली. उत्पादन शुल्क खात्याने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वीट कामगारांना कपडे

नांदेड : वाजेगाव परिसरातील वीट कामगारांना सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कपड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळाचे अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, मारोती कदम, विशालराज वाघमारे, मनोहर सर्जे, कुणाल भुजबळ, साईनाथ इंजेगावकर, सचिन कदम, घनश्याम विश्वकर्मा, मनोहर सर्जे आदी उपस्थित होते.

माहूर येथील शेतकरी सज्ज

माहूर : उन्हाच्या तडाख्यात सापडलेले शेतकरी आता खरिपाची तयारी करीत आहेत. शेतात पेरणीपूर्व मशागतीसाठी सज्ज झाले आहेत. मागील रब्बी हंगामात नुकसान सोसूनदेखील शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीसाठी कामाला लागला आहे.

आर्थिक पॅकेज द्या

नरसीफाटा : कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव लोहगावे यांनी केली. लॉकडाऊनमुळे न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट आदी बारा बलुतेदारांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले. या वेळी माधव चिंतले, माधव माचनवाड, गोविंद टोकलवाड आदी उपस्थित होते.

बिलोलीत भोजनवाटप

बिलोली : येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना भाजपच्या वतीने भोजनवाटप करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार, भाजपचे नागनाथ पाटील, शंकरराव काळे, मारोतराव मुर्के, शांतेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

महावीर जयंती साजरी

कंधार : कोरोना नियमांचे पालन करून पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली. पुजारी प्रदीप महाजन, जैन संघटनेचे अध्यक्ष राजहंस शहापुरे, उपाध्यक्ष अभयकुमार पहाडे, धनंजय मंगरूळकर, सचिव सतीश बिडवई यांनी महावीर यांना अभिवादन केले. समाजबांधवांनी घरीच राहून धार्मिक विधी व पूजा करून महावीरांना अभिवादन केल्याचे राजहंस शहापुरे यांनी सांगितले.

आरटीपीसीआर तपासणी

फुलवळ : मुंडेवाडी येथील ग्रामस्थांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. तालुका प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर करूनही मुंडेवाडीकडे आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकले नव्हते. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि लोकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. मुश्ताक शेख, आरोग्य कर्मचारी सुधाकर मोरे, आरोग्य सेविका गंगासागर माने, सरपंच ज्ञानेश्वर मुंडे, लक्ष्मण मुंडे यांची उपस्थिती होती.

सहा कर्मचारी बाधित

कुंडलवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतचे सहा कर्मचारी कोरोनाबाधित झाले. इतर कर्मचाऱ्यांवर आरोग्य तपासणी, लसीकरणाचा ताण पडत आहे. एक आरोग्य समुदाय अधिकारी, दोन एमपीडब्ल्यू, एक सुपरवायझर, एक आरोग्य सेवक, एक वाहनचालक असे सहा जण बाधित झाले. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे.

Web Title: Crowds of Umarikars in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.