शिवजयंती मिरवणुकीच्या प्रकरणात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST2021-02-22T04:12:28+5:302021-02-22T04:12:28+5:30
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून छोटा हत्ती या वाहनावर शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावून मिरवणूक काढण्यात आली ...

शिवजयंती मिरवणुकीच्या प्रकरणात गुन्हे
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून छोटा हत्ती या वाहनावर शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावून मिरवणूक काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणात हनुमंत कल्हाळे यांच्या तक्रारीवरून नारायण कदम, सुनील कदम, संभाजी हिरामण शिंदे, शैलेश पाटील, आकाश भोरे, अनिकेत जोशी, सचिन शेळके, विजय चव्हाण, अमोल मुत्तेपवार, शुभम कल्याणकर यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
चौकट- हदगावात दोन गुन्हे दाखल
हदगाव येथे शिवजयंतीनिमित्त विनापरवानगी मिरवणूक काढल्या प्रकरणात संदीप गणपतराव शिंदे, अरुण घोडजकर, धनंजय इंगळे, साईनाथ बाभूळकर यांच्यासह इतरांवर गुन्हे नोंदविण्यात आले. अन्य एका घटनेत बालाजी पांडुरंग कदम, बालाजी कर्हाळे, संदीप आढाव, विश्वजित पवार व इतर २० जणांवर गुन्हे नोंद झाले.