हल्लाबोल प्रकरणातील निर्दोष भाविकांवरील गुन्हे परत घ्यावेत; पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:06+5:302021-07-28T04:19:06+5:30
मुलाणी यांनी विद्यापीठास १५० रोपांची दिली भेट नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू ...

हल्लाबोल प्रकरणातील निर्दोष भाविकांवरील गुन्हे परत घ्यावेत; पालकमंत्र्यांना निवेदन
मुलाणी यांनी विद्यापीठास १५० रोपांची दिली भेट
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी ‘ग्रीन युनिव्हर्सिटी क्लीन युनिव्हर्सिटी’ ही योजना चालू केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी अनेक प्राध्यापकांना वृक्षलागवडीचे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत दूर शिक्षण विभागाचे संचालक प्रा. डॉ. रमजान मुलाणी यांनी मंगळवारी विद्यापीठास १५० रोपटी भेट स्वरूपात दिली. ही रोपटी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, प्रा. बी. एस. सुरवसे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, रामदास पेदेवाड, डॉ. मुमताज मुलाणी, गोविंद हंबर्डे, प्रीतम भराडिया, जयकिशन बागडी, पांडुरंग सूर्यवंशी, संभाजी धनमने, गणपत लुटे, शेख निसार, शहानुज मुलाणी, आदींच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.