शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या ३१८ ग्रामसेवक, शिक्षकांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:29 IST

जामीन मिळाल्यानंतर ग्रामसेवक व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचा न्याय देवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली. 

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : मुख्यालयी न राहता भाडे घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ३१८ कर्मचाऱ्यांविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात १० जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात २६ ग्रामसेवक, २९२ शिक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी ग्रामसेवक आणि शिक्षकांना जामीन मंजूर केला आहे.

अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायतीचे कामकाज पाहणारे ग्रामसेवक यांनी मुख्यालयी न राहता घरभाडे घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रारी दिल्यानंतर पाठपुरावा करून हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ३१८ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश अर्धापूर येथील न्यायालयाने दिले होते. त्यानुसार १० जुलै रोजी शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायतीचे कामकाज पाहणारे ग्रामसेवक यांच्यावर मुख्यालयी न राहता घरभाडे घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी अनेक तक्रारी देऊन पाठपुरावा करून हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर ३१८ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश अर्धापूर येथील न्यायालयाने दिले होते. त्यानुसार १० जुलै रोजी शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत गुन्हा दाखल झालेल्या सर्व ग्रामसेवक, शिक्षकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी ग्रामसेवक व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचा न्याय देवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली. 

विद्यार्थी, ग्रामस्थांना अडचणींचा सामना ?शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेस वेळ लागतो. यामुळे ज्ञानार्जनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषदच्या अनेक शाळां पावसाळ्यात गळत आहेत. विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाकडून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, शिक्षकांसाठी मुख्यालयी राहण्यासाठी वसाहत केंव्हा होणार असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच ग्रामस्थांना देखील ग्रामसेवक न्यायालयीन प्रक्रियेमुळे उपलब्ध न झाल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडTeacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायत