शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

'या' शेतकऱ्यांना स्मशानभूमी ठरतेय वरदान; पावसापासून लाख मोलाच्या शेतमालाचे होतेय संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 14:10 IST

अंत्यविधी एकही झाला नाही पण सोयाबीन ठेवण्यासाठी होतोय उपयोग

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली स्मशानभूमी

- सुनील चौरे

हदगाव ( नांदेड ) : सततच्या पावसामुळे ( Heavy Rainfall in Nanded ) तालुक्यातील सोयाबीन काढणी खोळंबली आहे. जस जमेल तसं शेतकरी पिक काढून घेत आहेत. मात्र, पावसाचा तडाखा सुरुच आहे. यावेळी केदारनाथ येथिल ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत बांधलेली स्मशानभूमी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकरी काढलेले सोयाबीन येथेच पावसापासून रक्षण करण्यासाठी साठवून ठेवत आहेत. ( crematorium became boon to 'this' farmers )

सन २०१०-११ मध्ये बांधलेल्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत या स्मशानभूमीत अद्याप एकही अंत्यविधी झाला नाही. या स्मशानभूमीसमोर खंडु बाजीराव भिसे आणि त्यांच्या भावांची शेती आहे. त्यांना आठ एकर जमीन आहे. शेतीच्या बाजूने नाला आहे. शेतात मळणी यंत्र जात नाही. रस्त्यावर सोयाबीनसजा ढिग करण्यासाठी मुबलक जागा नाही. पण शेतासमोरील बांधलेली स्मशानभूमी रिकामीच असल्याने यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण सोयाबीन येथे आणून जमा केले तर पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल. रस्त्यावर सोयाबीन आल्याने मळणी यंत्र ही मिळेल. दिड किमी डोक्यावर सोयाबिन घेऊन दिवसभर आठ दहा चक्करा करत चारही भावांनी सोयाबीन स्मशानभूमीतील सुरक्षित स्थळी ठेवले आहे. पीक सुरक्षित असल्याने त्याचे समाधान या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आहे.

स्मशानभूमी ठरतेय वरदानअतिवृष्टी झाली नसती तर मळणी यंत्र शेतात आले असते. पण दोन वर्षांपासून आम्हाला स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. खरं तर ग्रामीण भागात स्मशानभूमीकडे कोणी सहसा फिरकतच नाही. पण केदारनाथ येथील स्मशानभूमी शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी आता मागे पुढे या स्मशानभूमीचा उपयोग घेत आहेत. आता हिरवं असलेल सोयाबीन बाजुला काढून दोन दिवस वाळवता येईल. दोन चार दिवस मळणी यंत्र नाही मिळाले तरी अडचण नाही असे खंडु भिसे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस