शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 11:55 IST

Corona vaccine मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत.

- श्रीनिवास भोसलेनांदेड : नववर्षाच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांचे लसीकरणास ( Corona Vaccination ) सुरुवात केली. मात्र, १५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले आहे. (Covaxin shortage in Marathwada delays student vaccination) 

मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण हाच उपाय असल्याचा गाजावाजा करत प्रशासनाने लसीकरणाला गती दिली. त्यात ज्या पद्धतीने तिसऱ्या लाटेची भीती घालण्यात आली, तेवढ्याच झपाट्याने तिसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. याकाळात लसीकरणाची गती चांगली वाढली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारीपासून १५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. खास विद्यार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिनच देण्यात येत होते. नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने पहिल्याच आठवड्यात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून अपेक्षित टप्पा पूर्ण करून घेतला. दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक लागला होता. त्यानंतर पुन्हा मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली. 

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात जवळपास १ लाख ८१ हजार ९७२ जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. त्यापैकी ३१ जानेवारीपर्यंत ८९ हजार ३५१ जणांचे लसीकरण झाले आहे. तर, दुसरा डोस केवळ ६३ जणांनी घेतला आहे. दरम्यान, पुन्हा मागील काही दिवसांपासून कोव्हॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. केवळ नांदेडमध्येच नव्हे तर, संपूर्ण राज्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. पुढील आठवडाभर कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार नसल्याचेही लसीकरण केंद्रातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणात औरंगाबाद पिछाडीवर१५ ते १८ वयोगटात मराठवाड्यात सर्वाधिक लातूर जिल्ह्यात लसीकरण झाले आहे. १ लाख ३४ हजार ३१४ पैकी ८७ हजार ६३८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, सर्वात कमी औरंगाबादमध्ये २ लाख १३ हजार ८२३ पैकी १ लाख १ हजार ८२८ जणांना लस दिली. हिंगोलीमध्ये ६५,०६८ पैकी ३५,०२७, परभणी- १,०१,८९५ पैकी ५७,०८५, जालना - १,०९,४२८ पैकी ६२,२९३, उस्मानाबाद - ८६,८३१ पैकी ४३,२०५ तर, बीड जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ९१९ पैकी ७६ हजार १८५ जणांना पहिला डोस दिला आहे.

ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांची धावपळदहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन- ऑफलाईनचा घोळ सुरू असताना ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांसाठीच्या कोव्हॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी लसीकरण अनिवार्य केले तर, हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. त्यात लस घेतल्यानंतर काही दिवस ताप, अंगदुखी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तत्काळ लस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादNandedनांदेडMarathwadaमराठवाडा