शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

नांदेडमध्ये न्यायालयाच्या आदेशाने बांधकाम परवाने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:01 IST

घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकास्तरावर बांधकाम परवानगी देण्याचे काम थांबविण्यात आल्याचे सहायक नगररचनाकार संजय क्षीरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकास्तरावर बांधकाम परवानगी देण्याचे काम थांबविण्यात आल्याचे सहायक नगररचनाकार संजय क्षीरे यांनी सांगितले. या आदेशामुळे शहरातील विकासकामांना ब्रेक बसणार आहेच त्याचवेळी आगामी सण- उत्सव काळात बांधकाम क्षेत्रात सुरू होणाऱ्या नव्या योजनाही बारगळणार आहेत़ त्यातच विकास शुल्कातून प्राप्त होणारे मुख्य उत्पन्नही थांबणार आहे़नांदेड महापालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापनातंर्गत कचरा उचलण्याचे काम वर्षभरापासून सुरळीत सुरु आहे; पण कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर सदर कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कचऱ्यावरील प्रक्रियेचे काम सुरु झाले नसले तरी कचरा उचलला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामे बंद ठेवण्याबाबत प्रत्यक्ष मनपास्तरावर कोणतेही आदेश आतापर्यंत प्राप्त झाले नाहीत. परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव मागविण्यात आल्यामुळे १ आॅगस्टनंतर एकही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महापालिकेने बांधकाम परवानगीसाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाच्या सूचनेनुसार आॅनलाईन प्रस्ताव घेतले जात आहेत. नांदेडमध्ये मात्र १ आॅगस्टपासून एकही आॅनलाईन प्रस्ताव दाखल झाला नसल्याचे क्षीरे म्हणाले.आॅनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात २९ आॅगस्ट रोजी शहरातील अभियंते, वास्तुविशारद तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनाही दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. ‘बीपीएमएस महाराष्ट’ या संकेतस्थळावरुन आॅनलाईन प्रस्ताव दाखल करता येणार आहे. आॅनलाईन प्रस्तावात एका साध्या त्रुटीमुळे संपूर्ण प्रस्ताव त्रुटीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आॅनलाईन प्रस्तावाकडे नागरिक अद्याप वळलेच नाहीत.मनपाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत गोठणार

  • दरम्यान, महापालिकेकडे १ एप्रिल २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत ६५५ बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातील ६५० प्रस्तावांना महापालिकेने मंजुरी दिली असून विकास शुल्कापोटी १० कोटी ८० लाख ६५ हजार ६०४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या महिनाभरापासून विकास शुल्कापोटी मिळणारे उत्पन्न ठप्प झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बांधकाम परवानगी देणे आता पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोतच बंद पडणार आहे़
  • सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापन बंधनकारक करण्याबाबत दिलेला निर्णय हा योग्यच आहे़ त्याचवेळी महापालिकेला या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वेळ देणे आवश्यक आहे़ नवीन बांधकाम परवाना न देण्याचा निर्णय कठोर असला तरी भविष्यासाठी आवश्यक असल्याचे फरांदे डेव्हलपर्सचे संचालक कौस्तुभ फरांदे यांनी सांगितले़
  • महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये या निर्णयामुळे शहरातील विकासकामांना ब्रेक बसणार आहेच़ त्याचवेळी बांधकाम व्यावसायिकांचेही नुकसान होईल़ नवीन घर बांधणाऱ्यांसाठी हा निर्णय अडसर ठरणार आहे़ महापालिकांनीही घनकचरा व्यवस्थापन विषय गांभीर्याने घ्यावा,अशी प्रतिक्रिया जीनाइनचे संचालक केतन नागडा यांनी दिली़
  • बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या योजना या दसरा, दिवाळी याच कालावधीत सुरू होतात़ सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम परवानगीसंदर्भातील निर्णयामुळे नव्या योजना सुरू होणार नाहीतच़ याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसणार आहे़ त्याचवेळी घनकचरा व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे, असे जीव्हीसीचे संचालक गंगाप्रसाद तोष्णीवाल यांनी सांगितले़
टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHomeघर