न्यायालयीन लढाईचे ‘निखारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:30 IST2018-02-15T00:30:29+5:302018-02-15T00:30:34+5:30

खुनाचा आरोप असलेल्या एका निर्दोष युवकाची न्यायालयात सुुरु असलेली लढाई आणि खटल्याचा निकाल देण्यासाठी असलेल्या न्यायाधीशांची त्याबाबतची मत-मतांतरे या विषयावर आधारित ‘निखारे’ या नाटकाने रसिकांनी खिळवून ठेवले़

 Court battle | न्यायालयीन लढाईचे ‘निखारे’

न्यायालयीन लढाईचे ‘निखारे’

ठळक मुद्दे राज्य हौशी नाट्य स्पर्धा : खटल्याच्या निकालावेळची मत-मतांतरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : खुनाचा आरोप असलेल्या एका निर्दोष युवकाची न्यायालयात सुुरु असलेली लढाई आणि खटल्याचा निकाल देण्यासाठी असलेल्या न्यायाधीशांची त्याबाबतची मत-मतांतरे या विषयावर आधारित ‘निखारे’ या नाटकाने रसिकांनी खिळवून ठेवले़
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत कुसुम सभागृहात कलावलय वेंगुर्ले सिंधुदुर्गच्या वतीने रत्नाकर मतकरी लिखित संजीव पुनाळेकर दिग्दर्शित ‘निखारे’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले.
या खटल्यासाठी असलेल्या नवज्युरींचा गट आरोपीस तो खुनी कसा आहे? यावर मतमतांतरे होते़ पण त्यातील एकास तो खुनी नाही असे वाटते आणि त्यातून चर्चा रंगते. त्यानंतर सर्वच ज्युरींना तो खुनी नसल्याचे पटते़ ते सर्वच हायकोर्टाचे ज्युरी असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा, स्वभावाचा, विचारांचा, निकालावर कसा परिणाम पडतो किंवा त्या पद्धतीने त्यांचे विचार कसे उत्पन्न होतात़ एखाद्यास दोषी मानले की आपले विचारही तो दोषी कसा या पद्धतीनेच विचार करायला लागते. याला फाटा देत एखाद्यानेही त्यांच्या दुसºया बाजूने विचार केल्यास प्रकाशाची बाजू हळूहळू उजळ होते. गरज असते ते त्या विचारांची. या नाटकात ज्युरींची भूमिका चतुर पार्सेकर, सुरेंद्र खामकर, प्रसाद खानोलकर, विक्रांत आजगावकर, कृष्णा राऊळ, जितेंद्र वजराटकर, आत्माराम सोकटे, संजीव पुनाळेकर, प्रवीण सातार्डेकर यांनी साकारली तर कारकून- मयूर वेंगुर्लेकर, शिपाई- गौरेश वायंगनकर यांनी साकारले. या नाटकाचे नैपथ्य- उन्मेष लाड आणि प्रदीप परब यांनी वास्तववादी स्वरूपाचे साकारले. प्रकाशयोजना- स्वानंद सामंत आणि विष्णू वायंगनकर, ध्वनी- पंकज शिरसाट, रंगभूषा- हेमंत वर्धम, रंगमंच व्यवस्था पी. के. कुबल, गौरेश खानोलकर, सचिन होडावडेकर यांनी सांभाळली.
गुरुवारी कुसुम सभागृहात दुपारी ४ वाजता गाथा बहुउद्देशीय संस्था, ओरंगाबादतर्फे प्रवीण पाटेकर लिखित ‘अखंड’ तर आठ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह येथे ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राहुल जोंधळे लिखित ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ हा प्रयोग सादर होणार आहे़

Web Title:  Court battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.