शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

पहिल्याच वेचणीत होतेय कपाशीची पऱ्हाटी; कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:10 IST

सोयाबीननंतर कापसाच्याही उत्पन्नात होतेय मोठी घट

ठळक मुद्देउत्पन्नात निम्म्याने घट होण्याची भीतीराज्यपालाने जाहीर केलेल्या मदतीतून खर्चही निघेना

- श्रीनिवास भोसले

नांदेड : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाल्याचे चित्र असताना आता बाधित कपाशीच्या पहिल्याच वेचणीत पºहाट्या होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट होवून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे़ 

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे जवळपास सव्वाआठ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी सर्वाधिक सव्वातीन लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला़ त्यापाठोपाठ जवळपास अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती़ यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने आणि हिवाळ्यात पाणी देता येईल, असा जलसाठाही निर्माण झाला होता़ त्यामुळे शेतकरी समाधानी होता़ परंतु, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे स्वप्न मातीमोल झाले़ अतिवृष्टीने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या पाहणीत लावण्यात आला़ दरम्यान, पावसानंतरही कपाशी हिरवीगार दिसत होती़ तर बोंड लगडलेले पहायला मिळत होते़ तसेच काही ठिकाणी बोंडाची उगवण झाली तिथे मात्र बोंडामधील सरकीतून अंकुर फुटल्याचेही चित्र पहायला मिळाले़ परंतु, सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचे कमीच नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता़ 

जिल्हा प्रशासनाने कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या सहकार्याने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून नुकसानीची अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामध्ये २ लाख ४ हजार १६५ हेक्टरवरील कापसाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक किनवट तालुक्यातील ३९ हजार २५४ हेक्टरवरील कपाशीचे, त्यापाठोपाठ कंधार - ३० हजार ४७५ हेक्टर, लोहा - १५ हजार ५९५ हेक्टर, माहूर - १३ हजार २४९ हेक्टर, हिमायतनगर - १५ हजार ३५ हेक्टर, देगलूर - ८ हजार ५४३ हेक्टर, मुखेड - ८ हजार ४९६ हेक्टर, नांदेड तालुका - २ हजार ३१० हेक्टर, अर्धापूर - २ हजार ४५७, मुदखेड - १ हजार ४४३ हेक्टर, नायगाव - ८ हजार ९७५ हेक्टर, बिलोली - ६ हजार ७३४ हेक्टर, धर्माबाद - ८ हजार २२५ हेक्टर,  हदगाव - ८ हजार ८०० हेक्टर, भोकर तालुक्यात १४ हजार ९५३ हेक्टर तर उमरी तालुक्यात १३ हजार ५८ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे़ 

कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर असून यंदा जवळपास अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली होती़ यंदा पावसाळा चांगला झाल्याने हिवाळ्यात कापसाला पाणी मिळेल आणि उत्पन्न चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ परंतु, आॅक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाण्याची वापसा होण्यास विलंब झाला तर फुलं, पाते आणि छोट्या बोंडांना पावसाचा मारा होवून ते बाधित झाले़ परिणामी परिपक्व झालेल्या बोंडांची सध्या उगवण झाली असून त्यातील कपाशीची वेचणी सुरू आहे़ परंतु, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेचणीसाठी कपाशी ठेवण्याची गरजच पडणार नाही, असे चित्र पहायला मिळत आहे़ एकरामध्ये दहा ते पंधरा क्विंटल सरासरी कापसाचे उत्पन्न मिळते़ परंतु, अवकाळी पावसामुळे कपाशीचे उत्पन्न निम्म्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ 

उत्पन्नात निम्म्याने घट होण्याची भीतीयंदा पावसाळा चांगला झाल्याने हिवाळ्यात कापसाला पाणी मिळेल आणि उत्पन्न चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ परंतु, आॅक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे कपाशीचेही नुकसान झाले़ जमिनीतील पाण्याचा वापसा होण्यास विलंब झाला तर फुलं, पाते आणि छोट्या बोंडांना पावसाचा मारा होवून ते बाधित झाले़ परिणामी परिपक्व झालेल्या बोंडांची सध्या उगवण झाली असून त्यातील वेचणी सुरू आहे़ परंतु, दुसऱ्या आणि किंवा तिसऱ्या वेचणीसाठी कपाशी ठेवण्याची गरजच पडणार नाही, असे चित्र बहुतांश ठिकाणी पहायला मिळत आहे़ जिल्हा प्रशासनाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून नुकसानाची अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामध्ये २ लाख ४ हजार १६५ हेक्टरवरील कापसाचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक किनवट तालुक्यातील ३९ हजार २५४ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे़ 

राज्यपालाने जाहीर केलेल्या मदतीतून खर्चही निघेनाराज्यात अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त झालेला असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे़ दरम्यान, राज्यपालाकडून प्रतिहेक्टरी आठ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे़ या मदतीतून सोयाबीन आणि कपाशीसाठी प्रतिएकरी झालेला खर्च निघणेदेखील कठीण आहे़ अतिवृष्टीनमुळे सोयाबीनसह ज्वारी, मूग, उडीद आणि कपाशीचे नुकसान झाले़ काढणीच्यावेळी पावसाने घाला केल्याने सोयाबीन, मूग, उडीद काळे पडले असून मालाची गुणवत्ता घसरली आहे़ कपाशीची गुणवत्ता घसरली आहे़ बोलक्या बोंडाचे प्रमाण कमी असून बहुतांश ठिकाणी कपाशीच्या बोंडावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ तसेच काळ्या प्रतीचा आणि चिकटलेला कापूस वेचणीसाठी मजूर महिलाही जादा मजुरी घेत आहेत़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड