वक्फ बोर्डाची तीन एकर जागा मनपा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST2021-05-24T04:17:03+5:302021-05-24T04:17:03+5:30
कोरोना संकटात अंत्यविधीची सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या हॅप्पी क्लबनेही ही जागा कब्रस्तानमध्ये गुसलखाना उपलब्ध करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ...

वक्फ बोर्डाची तीन एकर जागा मनपा घेणार
कोरोना संकटात अंत्यविधीची सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या हॅप्पी क्लबनेही ही जागा कब्रस्तानमध्ये गुसलखाना उपलब्ध करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे विनंती केली आहे. हॅप्पी क्लबच्यावतीने जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९०० कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. खडकपुरा येथील कब्रस्तानमध्ये जवळपास दीड लाख लोकसंख्या आहे. नांदेड पश्चिममध्ये फक्त शिवाजीनगर भागात एक दफनभूमी आहे. त्यामुळे दुल्हेशाह रहेमाननगरच्या कब्रस्तानमध्ये कोरोनामुळे मयत झालेल्या अनेकांचा दफनविधी करण्यात आला; परंतु या भागातील नागरिकांमध्ये भय निर्माण झाले होते. जागेअभावी कोरोना मृतदेहांनादेखील रस्त्यावर देण्यात येत होता. त्याला काही नागरिक भयामुळे हरकतही घेत होते. त्यामुळे शिवाजीनगर येथील मस्जिदीत असलेल्या गुसलखान्यात मृतदेहांना गुसल द्यावा लागत आहे. या सर्व प्रक्रियेत दफनविधीसाठी विलंब होत आहे. त्यामुळे वक्फ महामंडळाने जागा उपलब्ध करून देण्यास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणीही हॅप्पी क्लबचे अध्यक्ष मोहंमद शोएब केली आहे.
या सर्व प्रक्रियेत जिल्हा प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिकेनेही कोरोना संकटात मुस्लीम नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी ही ३ एकर जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव आगामी सभेपुढे ठेवला आहे.