शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बळी; २३० बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:19 IST

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५५५ एवढी झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रकोप थांबेना सध्या १६६६ जणांवर उपचार सुरू

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. मागील २४ तासात  आणखी सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या १५९ एवढी झाली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी २३० बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५५५ एवढी झाली आहे.

मागील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र बुधवारी पुन्हा बाधितांचा आकडा दोनशे पार गेल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. बुधवारी स्वॅब तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २४, बिलोली ६, हदगाव १३, मुखेड १, हिंगोली १, लातूर १, नांदेड ग्रामीण आणि भोकर प्रत्येकी ३, देगलूर येथे १३, लोहा ११, नायगाव ७ तर परभणी येथील दोघेजण बाधित असल्याचे आढळून आले. अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ९२ जण बाधित आढळले आहेत.  अर्धापूर, लोहा येथे प्रत्येकी दोन, देगलूर ५, मुदखेड ३, धर्माबाद १६, उमरी ६, नांदेड ग्रामीण ५, भोकर १, कंधार ३,  मुखेड ६, नायगाव २ तर हिंगोलीतील एक जण बाधित असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.  बुधवारी नव्याने बाधित आढळून आलेल्या २३० रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ५५५ वर जावून पोहंचला आहे.

सध्या जिल्ह्यात १६६६ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक ७६६ जण पंजाब भवन कोविड सेंटरमध्ये असून विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८८ जणांवर उपचार सुरू आहे. तर जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीटलमध्ये ४० जणांवर उपचार सुरू असून नायगाव येथे ३१, बिलोली ३७, मुखेड १०४, देगलूर ६९, लोहा ५२, हदगाव १२, भोकर २१, कंधार १३, धर्माबाद ९९, किनवट येथील कोविड केअर सेंटरमध्ये १४ जणांवर उपचार सुरू आहेत. अर्धापूर येथे ३, मुदखेड ३१, माहूर ४, नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे २१, बारड कोविड केअर सेंटरमध्ये १, उमरी येथे २५ तर जिल्ह्यातील १२९ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्ह्यातील चार जणांना उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे. तर निजामाबाद आणि हैदराबाद येथील रुग्णालयात प्रत्येकी एकजण उपचार घेत आहे.

आजवर जिल्ह्यात ३१ हजार ६४९ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २५ हजार ३२० नमुने निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तर बुधवारी ११ स्वॅब नमुन्यांचे अहवाल अनिर्णित असून १३ स्वॅब प्रयोगशाळेने नाकारलेले आहेत. सद्य:स्थितीत १७९ स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित असून विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्यांपैकी १७५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आजवर १५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यूमागील २४ तासात जिल्ह्यात ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामधील पाच जण हे विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनावर उपचार घेत होते तर खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या १५९ एवढी झाली आहे.  मृतामध्ये लोहा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर आनंदनगर येथील ५२ वर्षीय महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील ६० वर्षीय महिला, नांदेड शहरातील विष्णूपुरी येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वजिराबाद येथील ८४ वर्षीय पुरुषालाही मृत्यूने गाठले आहे.

१३९  जणांनी केली कोरोनावर मातबुधवारी आणखी १३९ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने या रुग्णांना आता औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २७०० एवढी झाली आहे. यामध्ये विष्णूपुरी वैद्यकीय महाविद्यालयातील २, जिल्हा रुग्णालय १, हदगाव ४, माहूर ३, बिलोली १८, किनवट ४, नायगाव १२, मुदखेड ७, मुखेड २८, पंजाब भवन १३, देगलूर १, धर्माबाद ३१, अर्धापुूर ४ तर खाजगी रुग्णालयातील तिघेजण कोरोनामुक्त झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड