शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

coronavirus : नांदेड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 6:45 PM

शुक्रवारी प्रशासनाला १ हजार ४५९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी १ हजार २३४ जण निगेटिव्ह आले तर १८२ बाधित आढळून आले़

ठळक मुद्दे आतापर्यंत ११४ जणांचा कोरोनामुळे बळी शुक्रवारी नव्याने १८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचे दररोज सरासरी दीडशे बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ शुक्रवारी नव्याने १८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ रुग्ण संख्या आता ३ हजार ४२ एवढी झाली असून आतापर्यंत ११४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़ वाढत्या रुग्णसंख्येने सर्वांच्याच काळजीत भर टाकली आहे़

शुक्रवारी प्रशासनाला १ हजार ४५९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी १ हजार २३४ जण निगेटिव्ह आले तर १८२ बाधित आढळून आले़ त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा हद्द १९, अर्धापूर ५, बिलोली १, धर्माबाद १, कंधार ३, माहूर ३, नायगांव १, लोहा ७, हिंगोली ४, नांदेड ग्रामीण ४, भोकर १, देगलूर ३, हदगांव ७, किनवट ६, मुखेड १३, उमरी १ आणि परभणी १ येथील रुग्णांचा समावेश आहे़ तर अँटीजेन किट्सद्वारे तपासणी केलेल्यात नांदेड मनपा हद्द ३८, अर्धापूर ५, बारड ३, बिलोली १, धर्माबाद २, कंधार ६, मुखेड ३, हिंगोली १, नांदेड ग्रामीण ६, मुदखेड ५, भोकर १, देगलूर ६, हदगांव १, लोहा ३ आणि नायगांव तालुक्यात २१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़

शुक्रवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू : हदगांव तालुक्यातील तामसा येथे ७५ वर्षीय पुरुष, भावसार चौक नांदेड ६० वर्षीय पुरुष, काझी मोहल्ला कंधार ४२ वर्षीय महिला, मोमीन गल्ली मुखेड ८६ वर्षीय पुरुष आणि किनवटच्या एसव्हीएम कॉलनी येथील ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे़ १०८ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ६, हदगांव १४, जिल्हा रुग्णालय ६, देगलूर ११, मुंबई येथील १, खाजगी रुग्णालय २५, मुखेड २५, गोकुंदा २, अर्धापूर १, पंजाब भवन १५ आणि औरंगाबाद येथे उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा समावेश आहे़

पंजाब भवनमध्ये पाचशेहून अधिक रुग्णकोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एकट्या पंजाब भवन मध्ये तब्बल ५२६ रुग्ण उपचार घेत आहेत़ तर विष्णूपुरी येथील रुग्णालयात १५२, जिल्हा रुग्णालय ४०, नायगांव ९८, बिलोली २६, मुखेड १२१, देगलूर ९३, लोहा १५, हदगांव ६०, भोकर ८, उमरी १४, कंधार १७, धर्माबाद ३०, किनवट ३५, अर्धापूर २२, मुदखेड १७, हिमायतनगर २०, माहूर १०, आयुर्वेदीक रुग्णालय २८, बारड ५, महसुल भवन ४७, खाजगी रुग्णालय ११८, औरंगाबाद येथे ५, निजामाबाद १, हैद्राबाद १ आणि मुंबई येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत़ 

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस