Coronavirus In Nanded : चिंताजनक ! संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त वावर; भाजी विक्रेत्यांनीही थाटली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:07 AM2020-07-13T11:07:52+5:302020-07-13T11:17:54+5:30

नांदेडमध्ये सकाळच्या वेळी वजीराबादसह छत्रपती चौक भागात भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

Coronavirus In Nanded: Worrying! Vegetable vendors set up shops despite curfew; Citizens are wandering free | Coronavirus In Nanded : चिंताजनक ! संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त वावर; भाजी विक्रेत्यांनीही थाटली दुकाने

Coronavirus In Nanded : चिंताजनक ! संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त वावर; भाजी विक्रेत्यांनीही थाटली दुकाने

Next

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रविवारी मध्यरात्री पासून प्रशासनाने संचारबंदी लावली आहे. या काळात काही जणांना सूट देण्यात आली आहे. भाजी विक्रेत्यांनी एका जागी दुकान न थाटता घरपोच भाजी विक्री करण्याची अट घालण्यात आली आहे. परंतु नांदेडमध्ये सकाळच्या वेळी वजीराबादसह छत्रपती चौक भागात भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती, त्याचबरोबर शहरात दुचाकी वरून अनेकजण फेरफटका मारत असल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी अशाप्रकारे नागरिकांनी संचारबंदी चे आदेश धुडकावून लावले.

Web Title: Coronavirus In Nanded: Worrying! Vegetable vendors set up shops despite curfew; Citizens are wandering free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.