कोरोनाची रुग्णसंख्या शतकापारच; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:38+5:302021-05-31T04:14:38+5:30

जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ८९ हजार ३६७ वर पोहोचली आहे तर कोरोना बळींची संख्या १ हजार ८८३ झाली आहे. ...

Corona's population has been around for centuries; Death of three | कोरोनाची रुग्णसंख्या शतकापारच; तिघांचा मृत्यू

कोरोनाची रुग्णसंख्या शतकापारच; तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ८९ हजार ३६७ वर पोहोचली आहे तर कोरोना बळींची संख्या १ हजार ८८३ झाली आहे. रविवारी २२१ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. रविवारी ३ हजार २०९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा हद्दीत ३३, नांदेड ग्रामीण ६, अर्धापूर २, भोकर २, बिलोली १, देगलूर २, हदगाव २,हिमायतनगर २, लोहा १, माहूर ३, मुदखेड १, मुखेड ४ आणि नायगाव तालुक्यातील २ रुग्ण बाधित आढळले. अँटिजन तपासणीत मनपा हद्दीत ४५, नांदेड ग्रामीण १३, अर्धापूर १, हदगाव ३, कंधार २, किनवट ४, लोहा ३, माहूर ५, मुदखेड २, मुखेड २, हिंगोली ४, परभणी ३, नाशिक १ व पुणे जिल्ह्यातील एक रुग्ण आढळला.

कोरोनामुळे रविवारी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात नांदेडमधील छत्रपती चौकातील ६० वर्षीय महिला, काबरानगर येथील ६१ वर्षीय पुरुष आणि सांगवी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १ हजार ८८३ बळी गेले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७, बारड कोविड केअर सेंटर १, मुदखेड २, धर्माबाद ३, हिमायतनगर ४, माहूर १, बिलोली ४, लोहा १, किनवट २, भोकर ८, खासगी रुग्णालय २२ तसेच मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील १४६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील ३९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. नायगाव कोविड केअर सेंटरमध्ये ३, एनआरआय भवन २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत २५, कंधार ५, बिलोली १२, माहूर १३, हदगाव ५, किनवट २२, लोहा ८, मुखेड १०, धर्माबाद ६, देगलूर १३, भोकर १, मालेगाव ३, मांडवी १३, बिलोली १२ आणि खासगी रुग्णालयांत १०३ रुग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात महापालिका हद्दीत ७६८ आणि विविध तालुक्यांतर्गत ३०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona's population has been around for centuries; Death of three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.