कोरोनाची रुग्णसंख्या गतीने वाढू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:55+5:302021-02-24T04:19:55+5:30
जिल्ह्यात सोमवारी ३२कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २२ हजार ६१ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. ...

कोरोनाची रुग्णसंख्या गतीने वाढू लागली
जिल्ह्यात सोमवारी ३२कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २२ हजार ६१ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सोमवारी विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातून २०, देगलूर १, गोकुंदा १. हदगाव १ आणि खाजगी रुग्णालयातील ८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ५२, किनवट कोविड रुग्णालय १९, हदगाव ५, देगलूर ४ व खाजगी रुग्णालयात ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. मनपा अंतर्गत गृह विलगीकरणांतर्गत सर्वाधिक २२४ तर जिल्ह्यात विविध तालुक्यांतर्गत ५१रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी परतण्याचे प्रमाण ९४.७४ टक्के इतके आहे.