कोरोनाचा मारा त्यात चढला उन्हाचा पारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:27+5:302021-04-28T04:19:27+5:30
यंदा एप्रिलमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या जशी वाढत आहे, तशी उन्हाची तीव्रताही जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अवकाळी पावसाचा ...

कोरोनाचा मारा त्यात चढला उन्हाचा पारा
यंदा एप्रिलमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या जशी वाढत आहे, तशी उन्हाची तीव्रताही जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात मंगळवारी तापमानामध्ये थोडी घट पहायला मिळाली. संध्या कोरोनामुळे शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यामुळे नागरिकांना घरातच पंखे, कुलरपुढे बसून रहावे लागत आहे. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे व दमट वातावरण निर्माण झाले. यामुळे दुपारी आणि रात्रीच्या वेळी घामाघुम व्हावे लागत ाहे.
चौकट......
मे महिन्यात सर्वाधिक उष्ण लहरी...
बेसुमार जंगलतोड आिण पाण्याचा उपसा, शहरीकरण आणि प्रदुषणाचे परिणाम आता मानवाला भोगावे लागत आहेत. यामुळे तापमानामध्ये वाढ होत असल्याने यावर्षी एप्रिल-मे मध्ये उष्ण लहरी मनुष्याला भाजून काढणार आहेत. अतितापमान आणि उष्ण लहरींचे वर्ष म्हणून यंदाच्या वर्षाची नोंद होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मे महिन्याच्या शेवटी उष्ण लहरी वाहण्याची शक्यता आहे.