शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय, मृत्युदर मात्र चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 18:24 IST

Corona Virus : राज्यात सर्वाधिक मृत्युदर नंदुरबार जिल्ह्याचा ५.७० टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडचा मृत्युदर ५.१७ टक्क्यांवर गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देटॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्ये नांदेडसह लातूर, उस्मानाबादपॉझिटिव्हिटी रेटमध्ये परभणी तिसऱ्या क्रमांकावर

- विशाल सोनटक्के

नांदेड : रुग्णवाढीचा दर मराठवाड्यात कमी होत असून, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यांतील हा दर राज्याच्या दरापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे नांदेडसह मराठवाड्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असले तरी मृत्युदर मात्र चिंता वाढविणारा आहे.

राज्यातील अधिक मृत्युदर असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये नांदेडसह लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक मृत्युदर नंदुरबार जिल्ह्याचा ५.७० टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडचा मृत्युदर ५.१७ टक्क्यांवर गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.५ ते ११ मे या आठवड्यात राज्याचा मृत्युदर १.३२ टक्के राहिला आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडमध्ये ५.१७ टक्क्यांवर मृत्युदर गेला आहे, तर लातूर जिल्ह्याचा मृत्युदर २.५४ टक्के इतका असून, राज्यात चौथ्या क्रमांकावर उस्मानाबाद आहे. या जिल्ह्याचा मृत्युदर २.३९ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाने राज्यातील ५ जिल्ह्यांना मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १४ ते २० एप्रिल या कालावधीत नांदेडचा मृत्युदर १.७४ टक्के होता. २१ ते २७ एप्रिल या कालावधीत तो ३.७६ टक्क्यांवर गेला. २८ ते ४ मे या कालावधीत काहींशी घट होत तो ३.३५ टक्क्यांवर राहिला. मात्र, ५ ते ११ मे या कालावधीत हा दर वाढून पुन्हा ५.१७ टक्क्यांवर गेला. काहींशी अशीच स्थिती लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची आहे. त्यामुळे नांदेडसह लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांपुढे मृत्युदर रोखण्याचे आव्हान आहे.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये परभणी तिसऱ्या क्रमांकावरराज्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट २२.५७ टक्के आहे. मात्र, अहमदनगर, बुलढाण्यापाठोपाठ परभणीचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहमदनगरचा रेट सर्वाधिक ३९.५०, बुलढाणा ३७.९१, तर परभणी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३४.१३ टक्के आहे. बीड ३१.१७, जालना २८.६९, हिंगोली २७.९९, तर उस्मानाबादचा पॉझिटिव्हिटी रेट २५.२४ टक्के आहे. या तुलनेत नांदेड व औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. सध्या नांदेडचा पॉझिटिव्हिटी रेट १८.५२ टक्के असून, औरंगाबादचा हाच रेट मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे १०.३५ टक्के इतका आहे.

लसीकरणातही मराठवाडा मागेमागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा होत असल्याने लसीकरणाची मोहीम रेंगाळली आहे. विशेषत: राज्यात ४५ वर्षांहून अधिकच्या लाभार्थ्यांचे ३०.८१ टक्के लसीकरण झालेले असताना मराठवाड्यातील सर्वच जिल्हे यात मागे आहेत. जालन्यात ११ मे पर्यंत उद्दिष्टांच्या २२.५२, औरंगाबाद २१.९२, नांदेड २१.६९, लातूर २१.६१, परभणी २०.७९, बीड- २०.६९, उस्मानाबाद- २०.३५, तर हिंगोली जिल्ह्यात १३.६८ टक्के ४५ वर्षांहून अधिकच्या लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

पुढील आठवड्यापर्यंत या दरात निश्चित कमी होईलनांदेड जिल्ह्यात ऑक्सिजन रेमडेसिविरसह सर्व आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मागील काही दिवसांत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. मात्र, अनेक रुग्ण ऑक्सिजन लेवल ४०-५० टक्क्यांवर गेल्यानंतर उपचारासाठी दाखल होत असल्याने मृत्युदर वाढल्याचे दिसते. हा दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. पुढील आठवड्यापर्यंत या दरात निश्चित कमी होईल. - डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarathwadaमराठवाडाNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद