खेळाडू कौशल्यवाढीच्या चेनला कोरोनामुळे लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:21+5:302021-04-30T04:22:21+5:30
मार्च, एप्रिल महिन्यात जिल्हा क्रीडा कार्यालय, विविध क्रीडा संघटना तसेच विविध क्लब आणि अकॅडमीच्या माध्यमातून दीर्घकालीन उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे ...

खेळाडू कौशल्यवाढीच्या चेनला कोरोनामुळे लागला ब्रेक
मार्च, एप्रिल महिन्यात जिल्हा क्रीडा कार्यालय, विविध क्रीडा संघटना तसेच विविध क्लब आणि अकॅडमीच्या माध्यमातून दीर्घकालीन उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येते. या शिबिरांतर्गत ३० ते ४० दिवसांचे प्रशिक्षण होत असते. यातून खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेच्या वाढीसह त्या खेळाच्या कौशल्य वाढीसाठी प्रयत्न केला जातो. या प्रशिक्षण शिबिरातून अनेक खेळाडू आपली कामगिरी उंचावत असतात. त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिराचे बांधणी अनेक खेळांतून होत असते. कोरोनामुळे मागील वर्षी उन्हाळ्यात लॉकडाऊन होते. त्यामुळे हे शिबिरे होऊ शकले नाही. त्यानंतर जीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे यंदाही खेळाडू या शिबिराला मुकले आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्याच्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. उन्हाळी प्रशिक्षणामुळे सकाळी व सायंकाळच्या सत्रात खेळाडू अधिकाधिक वेळ देऊ शकतात.
चौकट-नांदेड शहरात जिम्नॅस्टिक खेळाचे दरवर्षी शिबिर आयोजित करण्यात येते. अनेक खेळाडू या शिबिरातून घडत असतात. यापूर्वी जिम्नॅस्टिकचे खेळाडू योग्य प्रशिक्षणामुळे देशपातळीवर खेळण्यास गेले आहेत. मात्र आता दोन वर्षांपासून या खेळाडूंचा सराव होत नसल्याने त्यांच्या शारीरिक हालचालींना ब्रेक बसला आहे.
चौकट- संचारबंदीमुळे मागील वर्षीपासून क्रीडा क्षेत्रावर मरगळ आली आहे. मागील वर्षी उन्हाळा संपल्यानंतर क्रीडा क्षेत्र सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. - प्रा. जयपाल रेड्डी, प्रशिक्षक, जिम्नॅस्टिक, नांदेड.