३६ जणांची कोरोना तपासणी अनिर्णित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:44+5:302021-04-20T04:18:44+5:30

मुदखेडमध्ये १५३ जणांवर उपचार नांदेड- ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी लोहा कोविड सेंटरमध्ये १२०, धर्माबाद सेंटरमध्ये १३५ ...

Corona test of 36 people concluded | ३६ जणांची कोरोना तपासणी अनिर्णित

३६ जणांची कोरोना तपासणी अनिर्णित

मुदखेडमध्ये १५३ जणांवर उपचार

नांदेड- ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी लोहा कोविड सेंटरमध्ये १२०, धर्माबाद सेंटरमध्ये १३५ तर मुदखेड येथील काेविड सेंटरमध्ये १५३ जणांवर उपचार सुरू होते. उमरीमध्ये ६४ तर माहूर कोविड सेंटरमध्ये ५५ जणांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कोळगाव येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नांदेड- रविवारी हदगाव तालुक्यातील कोळगाव येथील ३४ वर्षीय तरुणाचा जिल्हा रुग्णालयात कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील काही दिवसात तरुणवर्गही मृत्यूच्या विळख्यात सापडत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. मृत्यू पडलेल्या १५ जणांपैकी उर्वरित १४ जण ३५ पेक्षा अधिक वयाचे आहेत.

नांदेडचा पॉझिटिव्हिटी रेट २८.२५ टक्के

नांदेड- मागील काही दिवसात नांदेडमधील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट नांदेड जिल्ह्याचा झाला होता. मात्र मागील तीन-चार दिवसात रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण काहीसे घटल्याने हा रेट आता २८.२५ वर आला आहे.

नांदेडमध्ये तापमानाचा पारा वाढला

नांदेड- मागील काही दिवसात उन्हाळा झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. सोमवारी नांदेड शहरातील तापमान ४१ अंश सेल्सिअसवर गेले होते. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे भरउन्हाळ्यात पाणीसाठा मुबलक असल्याने यंदा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवलेला नाही.

Web Title: Corona test of 36 people concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.