ग्रामीण भागात कोरोना सुसाट, ना काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:09+5:302021-04-15T04:17:09+5:30

सरपंच, ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज गावातील रुग्णसंख्या वाढत असताना खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ...

Corona Susat, no contact tracing, no isolation in rural areas | ग्रामीण भागात कोरोना सुसाट, ना काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन

ग्रामीण भागात कोरोना सुसाट, ना काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन

सरपंच, ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज

गावातील रुग्णसंख्या वाढत असताना खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्या घरात रुग्ण आढळून आला आहे, त्यांना गृहविलगीकरणात ठेवणे, सर्वांची अँटिजेन तपासणी करणे आदी गोष्टींची खबरदारी घेऊन गाव सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अशा आजारांना अंगावर न काढता वेळीच तपासणी करून उपचार करणे गरजेचे आहे. कोरोनाची भीती न बाळगता योग्यवेळी उपचार करून घेतल्यास जीव वाचवू शकताे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाहीच

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. परंतु, भीतीपोटी त्याची कुठेही नोंद केली जात नाही. अनेकजण शहरात येऊन सीटीस्कॅन करत आहेत. त्यात दहापेक्षा अधिक स्कोर आला की, खासगीत ॲडमीट होत आहेत. परंतु, घरात अथवा इतर संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची काेरोना तपासणी केली जात नाही, त्याचबरोबर कोरोना संसर्ग झाल्याचे जाहीर करून इतरांना सतर्कही केले जात नाही. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. आपल्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास इतरांनी तपासणी करून घ्यावी. तसेच किमान सात दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, स्वत:च्या सुरक्षेबरोबरच गावाची सुरक्षा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे काळजी घेणे, हाच प्राथमिक उपचार समजून समंजस भूमिका घ्यावी.

- वाय. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय.

Web Title: Corona Susat, no contact tracing, no isolation in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.