कोरोनाविषयक राज्यस्तरीय जनजागृती ऑनलाईन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:18+5:302021-06-03T04:14:18+5:30

संशोधक डॉ. अमोल शिरफुले यांनी कोरोनाविषयक जनजागृती व आयुर्वेदिक उपाययोजना याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक ...

Corona State Awareness Online Camp | कोरोनाविषयक राज्यस्तरीय जनजागृती ऑनलाईन शिबिर

कोरोनाविषयक राज्यस्तरीय जनजागृती ऑनलाईन शिबिर

संशोधक डॉ. अमोल शिरफुले यांनी कोरोनाविषयक जनजागृती व आयुर्वेदिक उपाययोजना याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक तथा उद्योजक मारोतराव कंठेवाड हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी मागासवर्गीय विकास महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता कंठेवाड होत्या.

कंठेवाड म्हणाल्या, कोरोनामुक्त होण्यासाठी सामाजिक जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे. जगाच्या पाठीवर भारतातच योगा व प्रणायामचे महत्त्व असून भारतामध्ये आहारात पालेभाज्या, फळ, कडधान्य इत्यादींचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. अगदी पुरातन काळापासून देवाने आपल्याला देणगी म्हणून बेलाचे पान, तुळस, दुर्वा अशा वनौषधींचे महत्त्व विषद केले आहे.

योगगुरू संग्राम स्वामी कार्लेकर यांनी कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराला हरवण्यासाठी योग व प्राणायामचे महत्त्व आपल्या प्रात्यक्षिकांमधून सांगितले. प्रमुख मार्गदर्शिका सुलक्षणा शिवपुजे यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित योगा व आहाराचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कीर्ती गौतम जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्राचार्य कान्हा शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भास्कर पाईकराव यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी विलास वाळकीकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी कोरोना योद्धा म्हणून मीडिया व पत्रकार यांचा सत्कार संस्थापक मारोतराव कंठेवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वीतेसाठी नोडल ऑफिसर सुचित झिंजाडे, कमलेश इजळकर, पांडुरंग कुमारे, सुरेखा बास्टे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Corona State Awareness Online Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.