कोरोनाचा प्रकोप सुरुच, १८५९ नवे बाधित आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:39+5:302021-04-12T04:16:39+5:30
चौकट....... मृतामध्ये ५० वर्षावरील रुग्ण अधिक रविवारी जिल्हयातील २७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७ ...

कोरोनाचा प्रकोप सुरुच, १८५९ नवे बाधित आढळले
चौकट.......
मृतामध्ये ५० वर्षावरील रुग्ण अधिक
रविवारी जिल्हयातील २७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७ तर जिल्हा रुग्णालयात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात तिघांचा मृत्यू झाला असून, मुखेड आणि उमरी येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येक एकाचा मृत्यू झाला आहे. यशाेसाई रुग्णालयात दोघांचा तर गोदावरी काेविड सेंटरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. २७ मृतामधील २६ जणांचे वय हे ५० हून अधिक असल्याचे या अहवालावरुन स्पष्ट होते.
अनेकजण करताहेत कोविडवर मात....
रुग्णांची संख्या वाढत असली तरीही कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही दिलासा देणारी आहे. रविवारी जिल्ह्यातील ११३५ जणांनी कोराेनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४३ हजार ८९७ एवढी झाली आहे. जिल्हा रुग्णालयील २५, आयुर्वेदिक महाविद्यालय ११, मुखेड ३९, नायगाव १०, धर्माबाद ५, अर्धापूर ९, देगलूर १३, हदगाव १६, माहूर १३, उमरी १५, लोहा ३३, भोकर ४२ तर खाजगी रुग्णालयातील ११० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.