कोरोना मृत्यूच्या जबड्यात आता तरुणाईही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:23+5:302021-04-19T04:16:23+5:30
रविवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार अँटिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २०३, बिलोली ७४, कंधार ८८, मुखेड १०, हिंगोली ६, ...

कोरोना मृत्यूच्या जबड्यात आता तरुणाईही
रविवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार अँटिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २०३, बिलोली ७४, कंधार ८८, मुखेड १०, हिंगोली ६, नांदेड ग्रामीण २६, देगलूर ५२, किनवट ५, नायगाव ९६, यवतमाळ १, अर्धापूर ३, धर्माबाद ३२, लोहा ६, उमरी ४१, तर परभणी येथील एकजण नांदेडमध्ये बाधित आढळला. अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १७७, बिलोली ३२. हिमायतनगर ३, माहूर १७, उमरी ४९, हिंगोली ३, नांदेड ग्रामीण १२, देगलूर २२, कंधार १, मुदखेड १६, परभणी २, बुलडाणा १, अर्धापूर २३, धर्माबाद १०, किनवट ६३, मुखेड ७५, लातूर १, भोकर १२, हदगाव १५, लोहा १३, नायगाव १ आणि यवतमाळ येथील एकजण नांदेडमध्ये बाधित आढळला. सध्या १३ हजार ८२८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील १९७ जणांची प्रकृती गंभीर आहे.
चौकट-------------
११५६ जणांनी केली कोरोनावर मात
रविवारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आणखी ११५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५२ हजार ५४१ एवढी झाली आहे. रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ६०९, माहुर १५, किनवट २९, नायगाव १०, खासगी रुग्णालये १२३, मुखेड १७२, कंधार ३, बारड ९, अर्धापूर २३, आयुर्वेदिक महाविद्यालय २२, हदगाव २३, उमरी ९, लोहा ४०, तर मांडवी येथील १४ जण कोरोनामुक्त झाले.