२६ जणांचा कोरोनाने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST2021-04-08T04:18:25+5:302021-04-08T04:18:25+5:30
चौकट------------------- ३२ वर्षाच्या तरुणासह २६ जणांचा मृत्यू मागील २४ तासात जिल्ह्यात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ...

२६ जणांचा कोरोनाने घेतला बळी
चौकट-------------------
३२ वर्षाच्या तरुणासह २६ जणांचा मृत्यू
मागील २४ तासात जिल्ह्यात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये वजिराबाद परिसरातील ३२ वर्षाच्या तरुणाचाही समावेश आहे. यातील तीन मृत्यू विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात तर ११जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये झाला आहे. दोघांचा मृत्यू शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात झाला असून देगलूर येथेही दोघेजण कोरोनामुळे दगावले आहेत. हदगाव येथील एका ५७ वर्षीय पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ७ जणांचा मृत्यू नांदेड येथील विविध खाजगी रुग्णालयात झाला असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
चौकट----------------
११४२ जणांची कोरोनावर मात
एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही चिंता वाढविणारे आहे. मात्र त्यातही अनेकजण कोरोनावर यशस्वीपणे मात करीत असल्याचे दिसून येते. मागील २४ तासात जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमधील ११४२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामध्ये विष्णूपुरी रुग्णालयातील १५, मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील ७७१, कंधार ३, किनवट १७, हिमायतनगर ९, भोकर ४९, जिल्हा रुग्णालय १८, उमरी २१, नायगाव २९, मुखेड ७, देगलूर ७, अर्धापूर १२, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड १२, हदगाव ६, माहूर ११, धर्माबाद ११, लोहा २८ तर खाजगी रुग्णालयातील ११६ जणांचा समावेश आहे.