कोरोना मृत्यूनंतरही रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:37+5:302021-04-30T04:22:37+5:30
चौकट पाचजणांनाच परवानगी कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी जवळच्या पाच नातेवाइकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अंत्यविधीसाठी आल्यानंतर अग्नी देणाऱ्या ...

कोरोना मृत्यूनंतरही रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले
चौकट
पाचजणांनाच परवानगी
कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी जवळच्या पाच नातेवाइकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अंत्यविधीसाठी आल्यानंतर अग्नी देणाऱ्या नातेवाइकास मनपाच्या वतीने पीपीई कीटही देण्यात येते. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे जवळचे नातलगतही गोवर्धन घाटाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमार्फतच अंत्यविधी केला जातो. काही जण मात्र पीपीई कीट घालून आपल्या नातलगाचा अंत्यविधी करतात.
मनपाने उभारली यंत्रणा
कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महानगरपालिकेने विशेष यंत्रणा उभारली आहे. मनपाची शहरात सहा क्षेत्रीय कार्यालये आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी एक आठवडा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार ते रविवार असे आठ दिवस एका झोनचे आठ कर्मचारी अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडतात. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाइकांसह मृतदेह घेऊन आलेल्या ॲम्ब्युलन्सचेही सॅनिटायझेशन केले जाते.