झोपडपट्टी भागात कोरोना नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:45+5:302020-12-29T04:15:45+5:30

नांदेड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण पिरबुर्हाणनगर येथे आढळला होता. या ठिकाणच्या ७० वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा ...

Corona control in slum areas | झोपडपट्टी भागात कोरोना नियंत्रणात

झोपडपट्टी भागात कोरोना नियंत्रणात

नांदेड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण पिरबुर्हाणनगर येथे आढळला होता. या ठिकाणच्या ७० वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यानंतर मात्र कोरोनाचे रुग्ण वाढतच गेले. त्याचा सर्वाधिक धोका होता तो शहरातील झोपडपट्टी भागात. कारण झोपडपट्टी भागात कोरोनाचे नियम पाळण्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने या भागात ठिकठिकाणी तपासणी शिबिरे सुरू केली. रुग्णांच्या दारापर्यंत जाऊन त्यांची अँटिजेनद्वारे तपासणी करण्यात आली. बाधित आल्यास आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळल्यास लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते, तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत होता. या कामी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे घरोघर जाऊन या भागातील नागरिकांची तपासणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता या भागात आढळणारे रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या शहरातील चारही झोपडपट्टी भागात मिळून २० च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर काही जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या पथकाकडून त्यांची विचारपूस केली जाते. तसेच त्यांना औषधांचा पुरवठाही करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदर झोपडपट्टी भागात वेगाने पसरणारा कोरोना आता नियंत्रणात आला आहे.

Web Title: Corona control in slum areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.