रेल्वेचे कॉपर इलेक्ट्रिक तार चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:22+5:302021-07-27T04:19:22+5:30
एसबीआय बँकेसमोरून दुचाकी लंपास चंदासिंग कॉर्नर भागातील एसबीआय बँकेसमोरून चोरट्याने दुचाकी लंपास केली. ही घटना १७ जुलै रोजी घडली. ...

रेल्वेचे कॉपर इलेक्ट्रिक तार चोरीला
एसबीआय बँकेसमोरून दुचाकी लंपास
चंदासिंग कॉर्नर भागातील एसबीआय बँकेसमोरून चोरट्याने दुचाकी लंपास केली. ही घटना १७ जुलै रोजी घडली. हाणमंत धोंडिबा उपासे यांनी बँकेसमोरून दुचाकी उभी करून काही कामानिमित्त ते बँकेत गेले होते. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मूलबाळ होत नसल्याने छळ
देगलूर तालुक्यातील बाबानगर येथे मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. गाडी घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी मारहाण करण्यात आली. या प्रकरणात मिर्झा अक्रम मिर्झा अकबर, मिर्झा अकबर बेग, अमीर बेग, समीर बेग मिर्झा अकबर, बेगम, शबाना बेगम यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.
सावरगावात घरातून दारू विक्री
लोहा तालुक्यातील सावरगाव येथे घरातूनच दारू विक्री सुरु असताना पोलिसांनी धाड मारली. २४ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी २ हजार ७०० रुपयांची देशी दारू जप्त केली असून माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.