शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

राज्यसभेसाठी गरज असेल तर थेट संपर्क करा; ओवेसींचे महाविकास आघाडीला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:26 IST

विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत तर १६ छोट्या पक्षांचे आमदार आहेत.

नांदेड - राज्यसभा निवडणुकीत आमचे मत मिळावे यासाठी महाविकास आघाडीने अजून आमच्याशी संपर्क केला नाही. त्यांना गरज असेल तर थेट संपर्क करावा असे आवाहन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज केले. त्यांनी संपर्क केला तर त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्याचा विचार करू असे सांगून असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले. 

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक अत्यंत निर्णायक वळणावर असून भाजप आणि महाविकास आघाडी अपक्ष आणि छोट्या पक्षांचे मतदान खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. भाजप ऐनवेळी कोणता डाव टाकेल यामुळे महाविकास आघाडी सावध आहे. यामुळे प्रत्येक आमदाराच्या मताला किंमत आली आहे. 

विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत तर १६ छोट्या पक्षांचे आमदार आहेत. यात एमआयएमच्या दोन विधानसभा आमदारांचा समावेश आहे. ते कोणाच्या बाजूने मतदान करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केले. राज्यसभेसाठी गरज असल्यास महाविकास आघाडीने थेट संपर्क करावा, मतदान करण्याबाबत आम्ही विचार करू. त्यांनी ना आमच्या आमदारांशी संपर्क केला ना पक्ष नेतृत्वासोबत. दोन दिवसांत आमचा निर्णय आम्ही घेऊ असेही ओविसी यांनी जाहीर केले. अपक्ष आणि छोटे पक्ष ठरणार निर्णयक विधानसभेत १३ अपक्ष तर १६ छोट्या पक्षांचे आमदार आहेत. यापैकी बहुजन विकास आघाडी (३), समाजवादी पक्ष (२) , प्रहार जनशक्ती पक्ष (२), स्वाभिमानी शेतकरी संघटना (१) ,शेकाप (१) , क्रांतीकारी शेतकरी पक्ष (१ ), कम्युनिस्ट पक्ष (१) आणि ८ अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदार आहेत. तर भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष (१), राष्ट्रीय समाज पक्ष (१) आणि ५ अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे ११३ आमदार आहेत. विशेष म्हणजे, मनसे आणि एमआयएम या दोन पक्षांचे ३ आमदार सत्तास्थापनेसाठी तटस्थ राहीले होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेने तर मनसे आमदार भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयएम काय भूमिका घेतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNandedनांदेड