शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

बांधकाम कल्याणकारी मंडळाचे नाकापेक्षा मोतीच जड, याेजनांवरील खर्च केवळ ३८ टक्के : हजाराे काेटी रुपये पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:05 IST

बांधकाम कामगार व कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ असले तरी या मंडळाचा प्रशासकीय खर्चच सर्वाधिक अर्थात ५७.८५ टक्के आहे. त्या तुलनेत याेजनांवरील खर्च केवळ ३८.९८ टक्के आहे.

- राजेश निस्तानेनांदेड : बांधकाम कामगार व कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ असले तरी या मंडळाचा प्रशासकीय खर्चच सर्वाधिक अर्थात ५७.८५ टक्के आहे. त्या तुलनेत याेजनांवरील खर्च केवळ ३८.९८ टक्के आहे. या मंडळाकडे हजाराे काेटी रुपये पडून असताना याेजनांची अंमलबजावणी संथ गतीने का, असा सवाल विचारला जात आहे.बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे १० हजार ५८३ काेटी ७० लाख रुपये सद्य:स्थितीत जमा आहेत. त्यापैकी ८३० काेटी ५१ लाख रुपये याेजना व प्रशासकीय बाबींसाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यात प्रशासकीय खर्चाचा वाटा ५७ टक्के एवढा आहे, तर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या याेजनांवर केवळ ३८ टक्के खर्च झाला आहे.  मंडळामार्फत १३ याेजना राबविल्या जातात. ३१ ऑक्टाेबर २०२२ पर्यंत १९ हजार १६३ कामगारांना ४५० काेटी ३८ लाख रुपये विविध याेजनांतर्गत वाटप केले आहेत. दाेन वर्षांत ११ लाख ९८ हजार कामगारांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. राज्यात नाेंदणीकृत व जीवित बांधकाम कामगारांची संख्या १० लाख ४१ हजार ५१० एवढी आहे. 

वर्ग १ ते १० चे पाल्य    ९३,४०३    ३२.८३ काेटी दहावी-बारावी विद्यार्थी    १३,२७८    १३.२७ काेटी शैक्षणिक साहित्य खरेदी    २७,७९५    ५५.५५ काेटी वैद्यकीय-अभियांत्रिकी     १६,८५६    १११.६० काेटीपदवी-पदव्युत्तर, पदविका    ११,२३२    २४.३६ काेटी एमएससीआयटी    ६८९    २७.१६ लाखअपघाती मृत्यू    ६२    ३.८ काेटीनैसर्गिक मृत्यू    २,१६६    ४३.३२ काेटी घर खरेदी अनुदान    ४    ८ लाखघरबांधणी अनुदान    २    ४ लाखअपघात-अंत्ययात्रा    ३,२५६    ३.२५ काेटीविधवांना वेतन    ३,८०७    ९.१३ काेटी प्रसूती    १०,८४१    १८.१३ काेटी आजाराला वैद्यकीय मदत    ११८    १.१२ काेटी अपंग अर्थसाहाय्य    ४८    ९६ लाखकामगार विवाह    ७,७३५    २३.२० काेटी सुरक्षा साहित्य खरेदी    १,६१,९३७    ८०.९६  काेटीजीवनज्येाती विमा    ३५४    १.१६ लाखसुरक्षा विमा    ४३९    ५ हजारमुलीचा विवाह    २३३    १.१८ काेटी 

बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ असले तरी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पूर्ण क्षमतेने दिला जात नाही. त्यासाठी लाेकप्रतिनिधींची उदासीनताही तेवढीच कारणीभूत आहे.  - विशाल ठाकरे, माहिती अधिकार कार्यकर्ता  

तत्कालीन मंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातच सर्वाधिकमहाविकास आघाडी सरकारमधील कामगार मंत्र्यांच्या काेल्हापूर या गृह जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९४ हजार ९०६ कामगारांची नाेंदणी केली गेली आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी ३ हजार ४२७ कामगारांची नाेंद आहे. या याेजनेचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्रात दिला गेला आहे.

टॅग्स :Governmentसरकार