शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे गद्दार भाजपात; निष्ठ्वान कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना जागा दाखवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 14:46 IST

आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते मनापासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़

नांदेड : काँग्रेसचे अनेक गद्दार आज भाजपात दाखल झाले आहेत़ आज ते सत्ताधारी म्हणून मिरवत आहेत़ आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते मनापासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़ याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी काळात जिल्हा बळकावणाऱ्यांना आम्ही जागा दाखवू असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले़ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही सहभागी झाले होते़ यावेळी ते म्हणाले, नांदेड जिल्ह्यात प्रशासन आणि पुढाऱ्यांनी एकत्र येत मोठी लुट सुरू केल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला़ प्रत्येक विभागात भ्रष्टाचारांना कुरण उपलब्ध झाले आहे़ कोणतीही ठोस कारवाई अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट असताना वाळूचे शेकडो ट्रक परराज्यात जात आहेत़ महसूल अधिकारी मात्र आपला वाटा घेवून मोकळे होत असल्याची टीकाही त्यांनी केली़ यावेळी आ़डी़पी़सावंत यांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

आम्ही पदाला चिकटलेली माणस नाहीत  राहुल गांधी यांनी लोकसभेतील पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्ष थांबणारा नाही, सामान्य माणसाच्या प्रश्नाला पक्ष कायम आवाज देत राहील. आम्ही पदाला चिकटून राहणारी माणस नाहीत अशा शब्दात चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर मत व्यक्त केले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेड